कविता दर्जाने वाढली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:40 AM2021-02-28T04:40:37+5:302021-02-28T04:40:37+5:30

पाटील म्हणाले, आज मराठी भाषेमध्ये साहित्य लिहिणाऱ्यांची संख्या लक्षणीय रीतीने वाढली आहे. भाषा समृद्ध होत आहे, ही खरोखरच भाषेच्या ...

Poetry should increase in quality | कविता दर्जाने वाढली पाहिजे

कविता दर्जाने वाढली पाहिजे

Next

पाटील म्हणाले, आज मराठी भाषेमध्ये साहित्य लिहिणाऱ्यांची संख्या लक्षणीय रीतीने वाढली आहे. भाषा समृद्ध होत आहे, ही खरोखरच भाषेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. कविता करणे ही म्हणावी एवढी सोपी गोष्ट निश्चितच नाही. कवितेमध्ये अनुभवाची अनुभूती जन्म घेत असते. ही अनुभूती अस्वस्थ होण्यातून निर्माण होत असते. कलेतून मिळणारा आनंद हा कोणत्याही माध्यमातील आनंदापेक्षा निरपेक्ष असतो. विद्यार्थी दशेमध्ये असणारी नवउर्मी वेळीच बाहेर पडली, तर निश्चितच एक सुंदर कलाकृती जन्म घेत असते.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वेळवेगळ्या विद्याशाखांतील १८५ विद्यार्थी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डाॅ.बापूसाहेब शिंगाडे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा.अरुण लेले यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सचिन कदम यांनी केले, तर आभार प्रा.डॉ.प्रवीण केंद्रे व प्रा.मुक्त चितळकर यांनी मानले. उद्घाटन सत्रानंतर ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील ३२ विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या. स्पर्धेचे परीक्षण प्रा.सुशांत सातपुते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ.रवींद्र ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Poetry should increase in quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.