शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

खड्ड्यांचे नियमच खड्ड्यात

By मिलिंदकुमार साळवे | Published: August 26, 2017 7:08 PM

रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी भारतीय रस्ते महासभेने ठरवून दिलेली मानके व नियमानुसार न बुजविता याबाबतच्या नियमांनाच सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खड्ड्यात घालीत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने रस्त्यांवरील डांबरी पृष्ठभागावर पडणारे खड्डे नियम व विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करूनच भरण्याचे आदेश नव्याने दिले आहेत. त्यासाठी डांबरी पृष्ठ भागावरील खड्डे भरण्यापूर्वी व भरल्यानंतरची छायाचित्रेच संकेतस्थळावर (नेटवर) टाकण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देरस्त्यांवरील खड्डे नेटवरखड्डे भरा, अपलोड करा
अहमदनगर : रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी भारतीय रस्ते महासभेने ठरवून दिलेली मानके व नियमानुसार न बुजविता याबाबतच्या नियमांनाच सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खड्ड्यात घालीत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने रस्त्यांवरील डांबरी पृष्ठभागावर पडणारे खड्डे नियम व विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करूनच भरण्याचे आदेश नव्याने दिले आहेत. त्यासाठी डांबरी पृष्ठ भागावरील खड्डे भरण्यापूर्वी व भरल्यानंतरची छायाचित्रेच संकेतस्थळावर (नेटवर) टाकण्याचे आदेश दिले आहेत.‘लोकमत’ने गेल्या महिनाभरापासून अहमदनगरमधून नियमांचे उल्लंघन करुन होणारी अवजड वाहतूक व त्यामुळे अहमदनगर-मनमाड महामार्गासह शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत आवाज उठविला होता. आता राज्य सरकारनेच राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गुरूवारी अहमदनगर-मनमाड रस्त्यावर सावेडी थांब्यापुढील पेट्रोल पंपासमोर एक ट्रॅक्टर आला. त्यात खडी होती. त्याला जोडूनच मागे डांबर गरम करण्याचे मशिन होते. सोबत पिवळे जाकीट घातलेले मजूर. हा ताफा रस्त्यावर आला. रस्त्यावरील खड्डा थोडा स्वच्छ केला. त्यात डांबर ओतले. वरून खडी टाकली. अन् पुन्हा वरून डांबर. खड्डा बुजवून हा ताफा पुढे गेला. अशाच पद्धतीने नगरपालिका,महानगरपालिका व ग्राम पंचायत हद्दीतही खड्डे बुजविले जातात. पण डांबरी पृष्ठभाग असणाºया रस्त्यांवरील खड्डे कशा पद्धतीने बुजवावेत, याबाबत भारतीय रस्ते महासभा व सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना व निर्देश दिलेले आहेत. तसेच पण या सूचना व निर्देशांचे कुठेच पालन होताना दिसत नाही.जुन्या सूचना व मार्गदर्शक निर्देशांसोबतच आता नव्या तंत्रज्ञानाचा रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित रस्त्यांवरील पडणारे खड्डे डांबर मिश्रीत खडीने भरण्यापूर्वी खड्ड्यांची छायाचित्रे घेऊन तसेच खड्डे भरल्यानंतर त्याच खड्ड्याच्या ठिकाणची छायाचित्रे घ्यावीत. खड्डा भरण्याअगोदर व नंतरची ही छायाचित्रे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर कामनिहाय अपलोड करण्याचे आदेश राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत. विभागाचे उपसचिव प्रकाश इंगोले यांनी २३ आॅगस्टला बांधकाम विभागाच्या राज्यातील सर्व प्रादेशिक विभागांच्या मुख्य अभियंत्यांना याबाबत परिपत्रक पाठवून त्यांचे याकडे लक्ष वेधले आहे. ............................