..अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू-शिवाजी कर्डिले यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 04:21 PM2020-08-01T16:21:06+5:302020-08-01T16:21:52+5:30

शासनाने दुधाला कमीत कमी ३० रुपये प्रति लिटर भाव द्यावा. १० रुपये अनुदान द्यावे. अन्यथा  शेतक-यांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेऊ, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राहुरी येथे आंदोलन प्रसंगी दिला.

..Otherwise, let's intensify the agitation - Shivaji Kardile's warning | ..अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू-शिवाजी कर्डिले यांचा इशारा

..अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू-शिवाजी कर्डिले यांचा इशारा

Next

 राहुरी : शासनाने दुधाला कमीत कमी ३० रुपये प्रति लिटर भाव द्यावा. १० रुपये अनुदान द्यावे. अन्यथा  शेतक-यांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेऊ, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राहुरी येथे आंदोलन प्रसंगी दिला.

       राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर नगर-मनमाड रस्त्यालगत भाजपा, रासप व मित्र पक्षांच्या वतीने शनिवारी (१ आॅगस्ट) आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्डिले बोलत होते.

शरदराव बाचकर म्हणाले, माजी मंत्री महादेव जानकर दुग्ध खात्याचे मंत्री असताना शेतक-यांना नेहमी जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला. मात्र या सरकारने शेतक-यांची अवहेलना चालवली आहे. दुधाला त्वरित भाव वाढवून मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

 भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड आदींचेही भाषण झाले. नानासाहेब गागरे, उत्तमराव म्हसे, युवक तालुकाध्यक्ष  रवींद्र म्हसे, के. मा. कोळसे, उत्तमराव आढाव,  सुरेशराव बानकर, शरदराव पेरणे, बबन कोळसे, शहाजी जाधव, अविनाश बाचकर, संजय तमनर, प्रभाकर धसाळ, प्रभाकर हरिश्चंद्र, गणेश खैरे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, नायब तहसिलदार गणेश तळेकर यांना निवेदन देण्यात आले.
 

Web Title: ..Otherwise, let's intensify the agitation - Shivaji Kardile's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.