शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश : ‘मोहटा’ प्रकरणी कारवाईचा सखोल अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:27 AM

पाथर्डी तालुक्यातील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट यांनी मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सुवर्णयंत्र बनवून ते पुरताना कस्तुरी, गोरोचन यासारख्या पदार्थावर नियमबाह्य मोठा खर्च केला.

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट यांनी मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सुवर्णयंत्र बनवून ते पुरताना कस्तुरी, गोरोचन यासारख्या पदार्थावर नियमबाह्य मोठा खर्च केला. या मुद्यासह देवस्थानमधील आर्थिक अनियमिततेबाबत दाखल याचिकेवर बुधवारी (दि.२४) सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांनी येत्या ७ आॅगस्टपर्यंत कारवाईचा सखोल अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.मोहटा देवस्थानने देवी मंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सोन्याचे यंत्र पुरल्याप्रकरणी दाखल याचिकेवर यापूर्वी ११ जुलै रोजी उच्च न्यायालयाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवर पोलीस अधीक्षकांनी स्वत: लक्ष घालून चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता.पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या वतीने पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी पंडित प्रदीप जाधव, वास्तुविशारद शिंदे, मुख्याधिकारी सुरेश भणगे यासह संबंधित लोकांचे जबाब आदींचा २५० पानांचा चौकशी अहवाल उच्च न्यायालयात सादर केला. पोलिसांचा चौकशी अहवाल दाखल करून घेत उच्च न्यायालयाने सदरील अहवाल बंद पाकिटात ठेवण्याचे आदेशही न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिले.होमहवन करताना कस्तुरी व गोरोचन बाजारात सहज मिळत नाही. त्यामुळे हे पदार्थ कोठून आणले. गोरोचन विकणाºया दुकानदाराच्या साक्षी नोंदवून त्यांचीही सखोल चौकशी करून ७ आॅगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश बुधवारी न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व के. के. सोनवणे यांनी दिला. याचिकाकर्ते नामदेव गरड यांच्या वतीने अ‍ॅड. सतीश तळेकर, अजिंक्य काळे, अविनाश खेडकर, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नजम देशमुख बाजू मांडत आहेत.मोहटा देवस्थानचे जिल्हा न्यायाधीश पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार करताना सोन्याचे यंत्रे मंदिर परिसरात मंत्रोच्चारात विधीवत बसवण्याचा ठराव २०१० मध्ये करण्यात आला. यंत्रे विविध मूर्ती खाली पुरण्यात आली. ही यंत्रे तयार करणे व मंत्र उच्चारासाठी सोलापूरचे पंडित प्रदीप जाधव यांना तब्बल २४ लाख ८५ हजार रक्कम देण्यात आली आहे. याशिवाय वास्तुविशारद यांच्या प्रस्तावावरून हे सर्व काम कुठलीही निविदा न काढता करण्यात आले आहे. ‘लोकमत’ने २०१७ साली ‘मोहट्याची माया’ या मालिकेद्वारे हा प्रकार उघडकीस आणला होता. हे प्रकरण व त्यानंतरचा देवस्थानचा गैरकारभार याबाबत कारवाई होत नसल्याने गरड यांनी ही याचिका दाखल केलेली आहे.अंधश्रद्धा नव्हे, अपहार प्रकरणासारखा तपास करा..मोहटा येथील प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी केवळ अंधश्रद्धा या मुद्यावर लक्ष केंद्रित करू नये. देवस्थानने जनतेच्या पैशाचा अपव्यय व अपहार केला आहे. या मुद्यानुसार या प्रकरणाचा तपास करावा, असाही आदेश यावेळी न्यायालयाने दिला.लोकमतच्या मालिकेनंतर अंनिसच्यावतीने अविनाश पाटील, अ‍ॅड.रंजना गवांदे, बाबा आरगडे यांनी पोलिसात ट्रस्टच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याने तेही या याचिकेत हस्तक्षेपाद्वारे सहभागी झाले आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी