शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

विजय औटी यांची मंत्रिपदाची संधी दृष्टीक्षेपात : खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 5:44 PM

पारनेर येथे महिला व्यायामशाळा व हंगा येथे बाळासाहेब ठाकरे उद्यान, व्यायामशाळा व विविध कामांचे लोकार्पण राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते झाले.

पारनेर : आमदार विजय औटी यांचे काम राज्यात आदर्श आहे. त्यांच्या कडक स्वभावाची मुख्यमंत्री दखल घेतात. त्यांच्या मंत्रिपदाची संधी जवळ आली आहे, असे सूचक उद्गार पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काढले.पारनेर येथे औटी व महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुरेखा भालेकर यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या महिला व्यायामशाळा व हंगा येथे सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके, जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांच्या प्रयत्नातून झालेल्या गावातील बाळासाहेब ठाकरे उद्यान, व्यायामशाळा व विविध कामांचे लोकार्पण राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार औटी होते.खोतकर म्हणाले, पारनेर तालुक्यासारख्या दुष्काळी भागात औटी व सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी परिसरात विकास कामांच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवला. औटी म्हणाले, पारनेर शहरासह परिसरातील महिलांसाठी व्यायामशाळा असावी अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती सुरेखा भालेकर यांनी केली होती. यासाठी आपण जिल्हा क्रीडाधिकारी उदय जोशी यांच्याकडून तातडीने निधी मंजूर करून आणला. व्यायामशाळेमुळे महिलांना चांगली सुविधा झाली आहे.माजी सभापती जयश्री औटी यांनी आ. औटी यांच्यामुळे पारनेर शहरात विकासात्मक वाटचाल झाल्याचे सांगितले. डॉ. वर्षा पुजारी, डॉ. पद्मजा पठारे, सय्यद यांची भाषणे झाली. पारनेर येथे जि.प. सदस्य काशिनाथ दाते, रामदास भोसले, सेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावंकर, नगराध्यक्षा सीमा औटी, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, सभापती सुरेखा भालेकर, किसन गंधाडे, सेनेचे शहरपमुख निलेश खोडदे, जिल्हा क्रीडाधिकारी उदय जोशी, क्रिडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, आशा औटी, शारदा औटी उपस्थित होते़ राहुल झावरे, नामदेव ठाणगे, जयश्री झावरे, सुमन तांबे, युवराज गुंजाळ, रोहिणी मधे, आप्पासाहेब शिंदे, लिलाबाई रोहोकले या नूतन सरपंचांचा मंत्री खोतकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.हंगा येथे सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके व जि.प.सदस्य राणी लंके यांचा ग्रामस्थांच्यावतीने मानपत्र देऊन मंत्री खोतकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़ यावेळी चंद्रकांत मोढवे, राजेंद्र शिंदे, सरपंच हिराबाई दळवी, चंद्रकांत मोढवे, उपसरपंच संदीप शिंदे, बाबासाहेब साठे, बाबा नवले, संतोष ढवळे, सेनेचे उपतालुकप्रमुख दादा शिंदे, संदीप पवार, भाऊसाहेब नगरे उपस्थित होते.

टॅग्स :AhmadnagarअहमदनगरShiv SenaशिवसेनाVijay Autiआ. विजय औटी