शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पाणीप्रश्नाला विरोधकांनीच खोडा घातला-स्नेहलता कोल्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 3:51 PM

माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी महसूलमंत्री असताना कोपरगाव नगरपालिका साठवण तळ््यासाठी येसगाव परिसरात पालिकेला शेतजमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज शहरवासीयांच्या पिण्याच्या पाणीप्रश्नाची काही प्रमाणात सोडवणूक झाली. ही वस्तुस्थिती विरोधक नाकारत असून पाणीप्रश्नी त्यांचे फक्त राजकारण सुरू आहे. आपल्या प्रयत्नांना कुणीही एकत्रित साथ देत नाही, अशी खंत आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली.

कोपरगाव : माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी महसूलमंत्री असताना कोपरगाव नगरपालिका साठवण तळ््यासाठी येसगाव परिसरात पालिकेला शेतजमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज शहरवासीयांच्या पिण्याच्या पाणीप्रश्नाची काही प्रमाणात सोडवणूक झाली. ही वस्तुस्थिती विरोधक नाकारत असून पाणीप्रश्नी त्यांचे फक्त राजकारण सुरू आहे. आपल्या प्रयत्नांना कुणीही एकत्रित साथ देत नाही, अशी खंत आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली.शहरातील दत्तनगर परिसरात बुधवारी सायंकाळी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. निळवंडे शिर्डी कोपरगाव पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे, असा निर्धार कोल्हे यांनी व्यक्त केला. प्रारंभी नगरसेवक शिवाजी खांडेकर, गटनेते रवींद्र पाठक, फिरोज पठाण यांनी केंद्र व राज्य शासनामार्फत शहर विकासासाठी कोणत्या योजना आणल्या आणि भविष्यकालीन संकल्पना काय आहेत याबद्दल मार्गदर्शन केले. अविनाश पाठक, सनी वाघ यांच्यासह छत्रपती बॉईज आणि मावळा ग्रुपच्या युवकांनी आमदार कोल्हे यांच्या विकास कामाची माहिती जाणून घेतली.कोल्हे म्हणाल्या, शहरवासीयांना पिण्याचे शुध्द २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटीबध्द आहोत. सध्या चार आणि पाच नंबर साठवण तळे कामासंदर्भात विरोधक उलटसुलट माहिती देऊन आपल्याविषयी नागरिकांना भडकावून देण्याचे काम करीत आहेत. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. पाच नंबर साठवण तळ्याचे काम मार्गी लागावे. यासाठी पाठपुरावा केला. पाच नंबर साठवण तळ्याचे काम लवकर व्हावे. त्यात आपली आडकाठी नाही, मात्र निळवंडे शिर्डी पाणी योजना पहिल्या टप्प्यात सुरू होताना पुढे कोपरगावपर्यंत केली असताना त्यास औरंगाबाद खंडपीठात वेगवेगळ्या ठिकाणांहून याचिका दाखल करून आडकाठी आणली. पण ही योजना आपणच पूर्ण करणार आहोत. शहर विकासाचे वैभव वाढवून येथील ऐतिहासिक स्थळांचे पर्यटकीय महत्व ओळखून त्यावर काम केले आहे. उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019