शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

कांद्याने केली लाखोंची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 1:40 PM

एक-दोन वेळा कांद्याच्या पिकात मोठा तोटा सहन करावा लागला. परंतु जिद्द सोडली नाही, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अखेर कांद्याच्या पिकाने सावरल्याने संसार सुखाचा झाला आणि कांद्याच्या पिकात भरघोस उत्पन्न घेऊन लाखोंची कमाई करण्याची किमया पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील तरुण शेतकरी संतोष रामदास पालवे याने साधली.

अशोक मोरेपाथर्डी : एक-दोन वेळा कांद्याच्या पिकात मोठा तोटा सहन करावा लागला. परंतु जिद्द सोडली नाही, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अखेर कांद्याच्या पिकाने सावरल्याने संसार सुखाचा झाला आणि कांद्याच्या पिकात भरघोस उत्पन्न घेऊन लाखोंची कमाई करण्याची किमया पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील तरुण शेतकरी संतोष रामदास पालवे याने साधली. आजही त्यांच्याकडे चार एकर कांदा तयार झाला आहे.दहा वर्षापासून कांद्याचे उत्पन्न घेत असलेल्या संतोष पालवे या शेतकऱ्यास काही वेळा मोठा तोटा झाला. मुलांचे शिक्षण व संसारातील गरजा भागविता-भागविता मेटाकुटीस आलेल्या संतोषने जिद्द व मेहनतीच्या बळावर कांद्याचे भरघोस उत्पादन घेऊन लाखो रुपयांची कमाई केली. आजही चार एकरात त्यांनी कांद्याची लागवड केलेली आहे. याविषयी संतोष पालवे म्हणाले, चार एकर कांदा करताना मला रोप, लागवड, खते, फवारणी यासाठी एकरी ४० हजार रुपये खर्च आला. कांद्याला कोणती व किती खते वापरायची हे मी अनुभवातून शिकलो. कोणत्याही कृषीतज्ज्ञांची किंवा कृषी खात्याची मदत मी घेतली नाही. गादी वाफे करून त्यात कांद्याच्या रोपांची लागवड केली. विजेच्या लहरीपणामुळे रात्री-बेरात्री कांद्याला पाणी दिले. यात माझी पत्नी मंदा हिचा मोठा हातभार लागला. एकरी ३०० ते ३५० गोण्यापर्यंत उत्पन्न काढले. कांदा साठविण्यासाठी माझ्याकडे कांदा चाळ नाही. यामुळे मला मोठा आर्थिक फटकाही बसला. कांद्याचा भाव वाढला काय? आणि घसरला काय? याची चिंता न करता उत्पन्न घेतल्यास कांदा पीक शेतक-यांच्या फायद्याचे असून लाल कांद्याने अनेक शेतकरी मालामाल झाल्याचे त्यांनी सांगितले.आज माझ्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा आहे. यातूनच भविष्यात शेड बांधून बंदिस्त शेळीपालन करण्याचा माझा मानस असून कृषी विभागाने मला मार्गदर्शन केल्यास ते मोलाचे ठरू शकेल. यातून माझ्या पिकासाठी लागणा-या खताचा प्रश्न सुटून मी यापेक्षा जास्त उत्पन्न काढू शकेल, असे त्यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीFarmerशेतकरी