One lakh diamond gutkha, fragrant Panamsala seized | इंडिका कारसह हिरा गुटखा, सुंगधी पानमसाला जप्त

इंडिका कारसह हिरा गुटखा, सुंगधी पानमसाला जप्त

श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलिसांनी मांडवगण रोडवरील गणपती माळाजवळ एका ठिकाणी छापा टाकून आढळगाव येथील गुटखाकिंग विशाल बाळासाहेब बोथरे, नवनाथ बाळू शिंदे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून इंडिका कारसह हिरा गुटखा, सुंगधी पानमसाला असा एक लाखाचा मुद्दे जप्त केला. शनिवारी रात्री नऊ वाजता ही कारवाई केली. 

 पोलिसांनी संशयावरून इंडीका कारची झाडाझडती घेतली असता गुटखा तस्करीचे बिंग फुटले. विशाल बोथरे, नवनाथ शिंदे यांनी कारमधील गुटखा काढून दिला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. बी. झुंजार करीत आहेत. पोलीस हेड काॅस्टेबल प्रताप देवकाते यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. 

 

Web Title: One lakh diamond gutkha, fragrant Panamsala seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.