पत्रकार चौकात टँकर अंगावरून गेल्याने एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 01:06 PM2019-12-30T13:06:29+5:302019-12-30T13:06:37+5:30

शहरातील पत्रकार चौकात झालेल्या अपघातात  एकाचा जागीच मृत्यू झाला. टँकर अंगावरून गेल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मयत झालेल्या दुचाकीचालकाचे नाव कमलेश पटवा असल्याचे समजते.

One killed as a tanker passers-by in a journalist outpostपत्रकार चौकात टँकर अंगावरून गेल्याने एक ठार | पत्रकार चौकात टँकर अंगावरून गेल्याने एक ठार

पत्रकार चौकात टँकर अंगावरून गेल्याने एक ठार

Next

अहमदनगर : शहरातील पत्रकार चौकात झालेल्या अपघातात  एकाचा जागीच मृत्यू झाला. टँकर अंगावरून गेल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मयत झालेल्या दुचाकीचालकाचे नाव कमलेश पटवा असल्याचे समजते.
सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीचालक हे त्यांच्या दुचाकीवरून मध्य शहरातून सावेडीकडे निघाले होते. याचवेळी डीएसपी चौकाकडून येत असलेल्या टँकरची त्यांना जोराची धडक बसली. त्यात ते टँकरच्या चाकाखाली आले. त्यात त्यांच्या अंगावरून वाहन गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अपघात होताच पत्रकार चौकात मोठी गर्दी झाली. अपघात एवढा भयानक होता की टँकरचे चाक पूर्णपणे अंगावरून गेले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
शहरातून जड वाहतुकीला बंदी असतानाही वाहने शहरातून जात आहेत. त्यात पत्रकार चौकात नेहमीच मोठी गर्दी असते. गाडीच्या क्रमांकावरून वाहन चालकाचा शोध घेतला असला दुचाकीचालकाच्या मालकाचे नाव कमलेश अनिल पटवा असे आहे. मात्र अपघातात नक्की गेले कोण, याची अद्याप ओळख पटलेली नाही.
 

Web Title: One killed as a tanker passers-by in a journalist outpostपत्रकार चौकात टँकर अंगावरून गेल्याने एक ठार

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.