शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नगर-औरंगाबाद रोडवर कंटेनर-कार अपघातात एक ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 6:27 PM

कंटेनर-कार अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे.

नेवासा : कंटेनर-कार अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावरील देवगड फाट्यानजीक बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.विठ्ठल पांडुरंग कौसे (वय ३२, रा.कावलगाव, ता.पूर्णा, जि. परभणी) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर  अनिल सखाराम पारसकर (रा.हल्ली मुक्काम यमुना नगर, निगडी, ता.मावळ, जि.पुणे) हे जखमी झाले आहेत. पारसकर व कौसे हे स्वीप्ट कारमधून ( एम.एच.-१२ एन. एक्स.-७९८१) मंगळवारी नांदेड येथून पुण्याकडे निघाले होते. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास औरंगाबाद येथून पुण्याकडे जात असताना देवगड फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला कंटेनर (एम.एच.४६, बी.बी.- २८८९)  उभा होता. कंटेनरच्या मागील बाजूस कुठल्याही प्रकारचे इंडिकेटर तसेच रिफ्लेक्टर नसल्याने कार कंटेनरवर आदळली. यावेळी मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला राहणारे नागरिक त्वरित घटनास्थळी येऊन दोघांना कारमधून बाहेर काढले. मात्र चालक विठ्ठल कौसे हा जागीच ठार झाला. तर जखमी अनिल पारसकर यांना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अनिल पारसकर यांच्या जबाबावरून कंटेनरच्या चालकाविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघात