शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

हरिश्चंद्रगड अभयारण्यात शंभर फुटांचा वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 4:30 PM

राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील सर्वात उंच लोद नावाचा वृक्ष कोथळे गावालगत भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. आजपर्यंत हा वृक्ष प्रसिद्धीस आला नाही. 

मच्छिंद्र देशमुख। कोतूळ : अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई हे सर्वात उंच शिखर म्हणून प्रसिध्द आहे.  महाराष्ट्राचा प्राणी म्हणजे  ‘शेकरू’ सुद्धा अकोले तालुक्यातच आहे. राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील सर्वात उंच लोद नावाचा वृक्ष कोथळे गावालगत भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. आजपर्यंत हा वृक्ष प्रसिद्धीस आला नाही. अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखर हे राज्यातील सर्वात उंच शिखर गणले गेले आहे. तालुक्यातील दुसरी विशेष नोंद म्हणजे हरिश्चंद्रगड अभयारण्यातील  राज्यातील सर्वात उंच पानझडी वृक्ष लोद नावाचा वृक्ष. त्याची उंची ३०. ५० मीटर म्हणजे १०० फुटांपेक्षा जास्त आहे. गोलाई ९.१३ मीटर आहे. सरासरी विस्तार ११.५० मीटर असल्याची नोंद २००५ मध्ये एका लोखंडी फलकावर आहे. मात्र हे झाड तीन पिढ्यांपासून या जंगलातील सर्वात उंच झाड असल्याचे स्थानिक आदिवासी  सांगतात. इंग्रज सरकारने देखील याला महावृक्ष हे नाव दिले आहे. हा वृक्ष ज्या भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. भैरवनाथाची देवराई असल्याने किमान एक हजार वर्ष इथे कुºहाड चालली नाही. या देवराईत आजही लोद, आंबा, करप, सादडा, उंबर, माड, हिरड असे पन्नास ते ऐंशी फूट उंचीचे शेकडो वृक्ष आहेत. या ठिकाणी किमान पन्नास शेकरांची घरटी उंच झाडावर आहेत. वानरे, माकडे, सापांचीही रेलचेल आहे.   वृक्षाजवळ १५ वर्षांपूर्वी उंची व आकाराबाबत वन विभागाने फलक लावलेला आहे. लोद या वृक्षाचे शास्रीय नाव फायकस नवरेसा असे आहे.

लोद या वृक्षाबाबत अलिकडेच माहिती मिळाली आहे. उंचीबाबत तुलनात्मक दृष्टीने अनेक संपर्क व शोध घेतले.  इतक्या उंचीचा वृक्ष आढळत नाही.  विशेष संशोधन व भैरवगड परिसर शेकरांमुळे  सायलेंट झोन असल्याने जबाबदारी वाढली आहे, असे हरिश्चंद्र गडाचे वनपरिक्षेत्राधिकारी अमोल आडे यांनी सांगितले. 

    लोदाची झाडे कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात आहेत. तो वड व उंबर यांच्या वंशातला आहे. हा वृक्ष म्हणजे आपल्या अभयारण्याची शान आहे, असे  हरिश्चंद्र गडाचे वनपरिक्षेत्राधिकारी डी. डी. पडवळ यांनी सांगितले.     

सातवाहन ट्रेकर्सने राज्यातील दीडशे किल्ले, गडवाटा व जंगले पाहिली आहेत. मात्र इतक्या उंचीचा व वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आढळला नाही. रेकॉर्ड आॅफ बुकमध्ये नोंद केल्यास पर्यटनाला नवा इतिहास मिळेल, असे सातवहन ट्रेकर्स ग्रुपचे अध्यक्ष धनंजय गाडेकर यांनी सांगितले.      

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेenvironmentपर्यावरण