One commits suicide in Shegaon | शेवगावमध्ये गळफास घेऊन एकाची आत्महत्या
शेवगावमध्ये गळफास घेऊन एकाची आत्महत्या

शेवगाव : शहरातील श्रीराम कॉलनीत एकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अजय शहाजी इप्पार (वय ३२ रा. राहणार वंजारवाडी, ता.जामखेड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जामखेड येथील श्रीराम कॉलनीत अजय इप्पार हे सुरेश कांबळे यांच्या घरात भाड्याने खोली घेऊन रहात होते. त्यांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजता गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. याबाबत रमेश ढाकणे यांनी पोलिसात खबर दिली. दरम्यान ही घटना शुक्रवारी सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास घडली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अजय यांना औषधी उपचारासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी भेट दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनाम केला आहे. अजय यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक घुगे हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: One commits suicide in Shegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.