शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

गावठी कट्ट्यासह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 2:47 PM

नेवासा : तालुक्यातील कुकाणा येथे कृषी उत्पन्न उपबाजार समितीजवळ विक्रीसाठी गावठी कट्टा घेऊन आलेल्या ओरापीला पोलिसांनी शिताफीने अटक करण्यात केली. आरोपीकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.कुकाणा येथे अवैध धंद्याची माहिती घेण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास शाखेचे प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, गणेश मैड, ...

नेवासा : तालुक्यातील कुकाणा येथे कृषी उत्पन्न उपबाजार समितीजवळ विक्रीसाठी गावठी कट्टा घेऊन आलेल्या ओरापीला पोलिसांनी शिताफीने अटक करण्यात केली. आरोपीकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.कुकाणा येथे अवैध धंद्याची माहिती घेण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास शाखेचे प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, गणेश मैड, जयवंत तोडमल, महेश कचे, भीमराव पवार हे आले होते. त्यांना बाजार समितीजवळ कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती आल्याची माहिती मिळाली. पोलीस तेथे गेले असता बाजार समितीच्या भिंती नजीक एक इसम संशयितरित्या फिरताना आढळला. त्यास हटकले असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. तसेच त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळून आला. त्याने आपले नाव राजू ज्ञानेश्वर साळुंके (वय २१, रा. कुकाणा) असल्याचे सांगितले. पोलीस कॉन्स्टेबल गणेश सुरेश मैड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड हे करीत आहेत.

टॅग्स :AhmadnagarअहमदनगरCrimeगुन्हा