Not just controversial statements; Answer to the administration of Indorekar | समोर आलेला व्हीडिओ संदिग्ध; इंदोरीकरांचे प्रशासनाला उत्तर

समोर आलेला व्हीडिओ संदिग्ध; इंदोरीकरांचे प्रशासनाला उत्तर

अहमदनगर : नगर जिल्ह्यात आपण तसे वादग्रस्त वक्तव्य कोठेही केलेले नाही. समोर आलेला व्हीडिओही संदिग्ध असून वक्तव्याचा विपर्यास केल्याचा खुलासा इंदोरीकर यांनी केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनात गर्भलिंग निदानाबाबत वक्तव्य केले होते. त्यामुळे गर्भधारणापूर्व प्रसवपूर्व लिंगनिदान प्रतिबंध समितीने (पीसीपीएनडीटी) १२ फेब्रुवारी रोजी इंदोरीकर यांना अधिकाऱ्यामार्फत नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले होते. याबाबत इंदोरीकर यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्धीपत्रक काढून माफीनामा जाहीर केला. इंदोरीकर यांचे वकील पांडुरंग शिवडीकर व महाराजांचे काही सेवक जिल्हा रुग्णालयात आले होते.

मनसेचा इंदोरीकरांना पाठिंबा
ह.भ.प. इंदोरीकर महाराजांच्या दिलगिरीनंतरही त्यांना काळे फासण्याचा इशारा देणाºया तृप्ती देसार्इंना मनसेने आव्हान दिले आहे. इंदोरीकर महाराजांच्या केसाला धक्का लावून दाखवा, मग बघा काय होते, असा इशारा मनसेच्या पुणे महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी दिला आहे.

Web Title: Not just controversial statements; Answer to the administration of Indorekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.