खुर्ची न मिळाल्याने राम शिंदे उतरले स्टेजच्याखाली; देवेंद्र फडणवीसांसमोर घडला प्रकार

By साहेबराव नरसाळे | Published: May 26, 2023 02:22 PM2023-05-26T14:22:51+5:302023-05-26T14:25:37+5:30

पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे

Not getting a chair, Ram Shinde got down under the stage; What happened in front of Devendra Fadnavis | खुर्ची न मिळाल्याने राम शिंदे उतरले स्टेजच्याखाली; देवेंद्र फडणवीसांसमोर घडला प्रकार

खुर्ची न मिळाल्याने राम शिंदे उतरले स्टेजच्याखाली; देवेंद्र फडणवीसांसमोर घडला प्रकार

googlenewsNext

अहमदनगर -  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीप्रसंगी माजी मंत्री आमदार राम शिंदे यांना खुर्ची न मिळाल्याने ते स्टेजच्या खाली उतरले. ते पाहिल्यानंतर फडणवीस यांनी त्यांना पुन्हा स्टेजवर बोलावून खुर्ची देण्याची व्यवस्था केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत सर्व मान्यवर खुर्चीवर विराजमान होत असताना राम शिंदे यांच्यासाठी खुर्चीचे व्यवस्था नव्हती. ते पाहून त्यांचा चेहरा एकदम उतरला व ते थेट स्टेजच्या खाली निघून गेले. हे मानापमान नाट्य फडणवीस यांनी पाहताच राम शिंदे यांना पुन्हा स्टेजवर बोलावून घेत त्यांना पाठीमागील एक खुर्ची घेऊन आपल्या शेजारी बसवून घेतले. 

एका बाजूला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे तर दुसऱ्या बाजूला आ. राम शिंदे यांना बसविण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे. त्यामुळे या मानापमान नाट्याची चर्चा रंगली आहे.

Web Title: Not getting a chair, Ram Shinde got down under the stage; What happened in front of Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.