श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू, गार कंन्टोमेंट झोन तर कौठा बफर झोनमध्ये; गावांच्या सीमा लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 02:59 PM2020-05-18T14:59:19+5:302020-05-18T15:00:20+5:30

दौड शहरात ३२ जवान कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे दौंड शहरापासून पाच किलोमीटर अंतरातील कंन्टेमेंट झोन तर कौठा बफर झोनमध्ये आले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ दिवस हा परिसर लॉक करण्यात आला आहे. 

Nimgaon Khalu in Shrigonda taluka, Gar cantonment zone and Kautha in buffer zone; Village boundary lock | श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू, गार कंन्टोमेंट झोन तर कौठा बफर झोनमध्ये; गावांच्या सीमा लॉक

श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू, गार कंन्टोमेंट झोन तर कौठा बफर झोनमध्ये; गावांच्या सीमा लॉक

googlenewsNext

श्रीगोंदा : दौड शहरात ३२ जवान कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे दौंड शहरापासून पाच किलोमीटर अंतरातील कंन्टेमेंट झोन तर कौठा बफर झोनमध्ये आले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ दिवस हा परिसर लॉक करण्यात आला आहे. 
 दौड शहरात आठ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यावेळी श्रीगोंद्यातील गार व निमगाव खलू याचा गावांचा बफर झोन समावेश करण्यात आला होता. ही गावे दौड शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहेत. हाय रिक्स म्हणून निमगाव खलू व गार ही गावे कंन्टेमेंट झोनमध्ये तर दौड शहरापासून पाच किलोमीटर आतील कौठा हे गाव बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या गावांच्या सीमा लॉक करण्यात आल्या आहेत. 
श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली केली आहे. आरोग्य, महसूल, पोलीस कर्मचारी तीन गावात तळ ठोकून आहेत.  कौठा, खोरवडी बंधाºयावरून होणारी वाहतूक बंद केली आहे. दौंडला कोणत्याच कामासाठी जाऊ नये, अशी दवंडी गार ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली. काष्टी, श्रीगोंदा येथील डॉक्टरांनी दौडला रुग्ण पाठवू नयेत. चेक पोस्टवर कडक तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. घराच्या बाहेर कोणी पडू नये, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत.
मदत तहसीलदारांकडे जमा करा
दौंड येथील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक ७ मधील जवान कोरोना संक्रमित झाले आहेत. यामुळे निमगाव खलू, गार या दोन गावांचा परिसर १४ दिवसासाठी लॉक करण्यात आला आहे. या गावातील नागरिकांना बाहेर जाता येणार नाही. बाहेरील नागरिकांना या गावात येता येणार नाही. सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, व्यक्ती यांनाही थेट मदत घेऊन जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. सर्व प्रकारची मदत प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. सेवाभावी संस्थांनी मदत तहसीलदारांकडे जमा करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.   
 

Web Title: Nimgaon Khalu in Shrigonda taluka, Gar cantonment zone and Kautha in buffer zone; Village boundary lock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.