गावागावात राहिबाई निर्माण होण्याची गरज : चंद्रकांत पाटिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 06:29 PM2019-03-03T18:29:42+5:302019-03-03T18:29:47+5:30

महिलांचे आरोग्य, शिक्षण व महिला स्वयंपूर्ण होण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगतानाच पारंपरिक बियाणे संवधंर्नातून देशभर ओळख निर्माण केलेल्या राहिबाई पोपेरे यांचे कार्य सर्वासाठी पथदर्शी आहे.

The need to create a living in the village: Chandrakant Patil | गावागावात राहिबाई निर्माण होण्याची गरज : चंद्रकांत पाटिल

गावागावात राहिबाई निर्माण होण्याची गरज : चंद्रकांत पाटिल

Next
ठळक मुद्देबीजमाता राहिबाईं पोपेरे यांच्या बियाणे बँकेचे उद्घाटन

शिर्डी : महिलांचे आरोग्य, शिक्षण व महिला स्वयंपूर्ण होण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगतानाच पारंपरिक बियाणे संवधंर्नातून देशभर ओळख निर्माण केलेल्या राहिबाई पोपेरे यांचे कार्य सर्वासाठी पथदर्शी आहे. गावागावात राहिबाई निर्माण होण्याची गरज असल्याचे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटिल यांनी व्यक्त केले
कोंभाळणे (ता. अकोले) येथे बीजमाता राहिबाई पोपेरे यांच्या गावरान बियाणे बँकेच्या व घराच्या उद्घाटनावेळी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाते. सरपंच शांताबाई पोपेरे, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, अशोक भांगरे, संदिप भुजबळ, शिवाजी धुमाळ, सुनिता भांगरे, बाजीराव दराडे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, दुर्गम भागात पारंपारिक बियांणे संवर्धनाच्या कामामुळे राहिबाईंचे नाव जगभर झाले. स्वत:सोबतच परिसरातील महिलांना बरोबर घेऊन राहिबाईंनी केलेले पारंपारिक बियांणे संवर्धनाचे काम पथदर्शी आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात राहिबाईंनी बोलतांना बीज बँक व घराची अडचण मांडली. राहिबाईंनी मांडलेली अडचण दूर करण्यासाठी त्यांना पर्यांवरणपुरक बियाणे बँक उभी करुन दिली आहे. या बियाणे बँकेच्या माध्यमातून पारंपारिक बियाणांच्या संवर्धनासोबतच पारंपरिक बियाणांचा प्रचार व प्रसार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोंभाळणे परिसरात ७२ किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांची अडचण दूर होणार आहे. मोबाईल टॉवरचीही उभारणी करण्यात येणार असून त्यामुळे भ्रमणध्वनी सुविधा लवकरच मिळणार आहे. यासोबतच गावातील आवश्यक सोईसुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, दुर्गम भागात राहिबाईंनी बियाणे संवर्धनाच्या कामातून संपुर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. केंद्रशासनाकडूनही राहिबाईंच्या कार्यांचा गौरव होणार आहे. राहिबाईंनी दुर्गम भागात सेवाभावी वृत्तीने केलेले काम नक्कीच दिशादर्शक ठरेल.

बियाणे जपण्याचे काम वाढविणार
बीजमाता राहिबाईं पोपेरे म्हणाल्या, वीस वर्षांपासून पारंपारिक बियाणे संवर्धनाचे काम करत आहे. आज तीन हजार महिलांसोबत काम करते. पारंपरिक बियाणे संवर्धनासाठी आवश्यक बियाणे बँक व घरांची अडचण पुण्यातील एका कार्यक्रमात मांडली. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या मागणीची तातडीने दखल घेत बियाणे बँक व घरांची उभारणी करुन दिली. याचा मला मोठा आनंद झाला आहे. या बियाणे बँकेच्या मदतीने न पारंपरिक बियाणे जपण्याचे काम वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: The need to create a living in the village: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.