NCP will not leave Ahmednagar seat: Ajit Pawar | राष्ट्रवादी अहमदनगर लोकसभेची जागा सोडणार नाही : अजित पवार
राष्ट्रवादी अहमदनगर लोकसभेची जागा सोडणार नाही : अजित पवार

अहमदनगर : राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीत अहमदनगर लोकसभेची जागा सोडणार नाही. जनसंघर्ष यात्रा जिथे जाते, तिथे ते हेच सांगत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी नगरमध्येही हेच सांगितले. पण नगरची जागा राष्ट्रवादीच लढविणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अहमनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यांनी काय बोलयचे तो त्यांचा प्रश्न आहे. सद्यस्थितीत त्यांची राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. या दरम्यान सुमारे ३५ ते ४० ठिकाणी त्यांनी ही जागा आपल्याकडे घेऊ, असे सांगितले आहे. अंतिम निर्णय १२ तारखेला होईल. अजित पवार कधीही खोटे बोलत नाही. हे महाराष्ट्राला माहित आहे, जे मी सांगतो आहे, तेच होईल आणि तुम्हाला ते दिसेल, असेही पवार म्हणाले. अशोक चव्हाण हे विखेंना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही पवार म्हणाले.


Web Title: NCP will not leave Ahmednagar seat: Ajit Pawar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.