शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नगर मनपा निवडणूक २०१८ : प्रभाग १५ मध्ये शिवसेना-राष्ट्रवादीचे पॅनल मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:32 AM

महापालिकेत पदे भूषविणाऱ्या महापौर, उपमहापौर, सभापती यांचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल तयार झाले असून प्रचारही रंगला आहे.

अहमदनगर : महापालिकेत पदे भूषविणाऱ्या महापौर, उपमहापौर, सभापती यांचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल तयार झाले असून प्रचारही रंगला आहे. भाजपकडे इच्छुकांचा ओढा जास्त असल्याने अद्याप पॅनल तयार झाला नाही. काँग्रेस व मनसेकडूनही अनेकजण इच्छुक आहेत. माजी उपमहापौर गीतांजली काळे आणि माजी सभापती सुवर्णा जाधव यांच्यात सामना रंगणार आहे.रेल्वे स्टेशन, आगरकर मळा ते केडगावपर्यंत हा प्रभाग पसरला आहे. पूर्वीच्या प्रभाग क्रमांक २७ आणि २८ यांचा मिळून हा प्रभाग तयार झाला आहे. प्रभाग क्रमांक २७ मधून अनिल शिंदे (शिवसेना), सुवर्णा जाधव (मनसे), विजय गव्हाळे व आशा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) असे चौघे निवडून आले होते. प्रभाग क्रमांक २८ मध्ये झालेल्या पथदिवे घोटाळ््याने जुना प्रभाग क्रमांक २८ चांगलाच चर्चेत आला होता. माजी महापौर शीला शिंदे यांचे पती अनिल शिंदे यांनी सव्वा वर्ष सभागृहनेतेपद भूषविले. तर सुवर्णा जाधव यांनीही शिवसेनेच्या मदतीने स्थायी समितीचे सभापतीपद मिळविले होते. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. चारही जागांसाठी इच्छुकांची संख्या असल्याने चांगली लढत पहायला मिळणार आहे.भाजपकडेही इच्छुकांचा ओढा आहे. अद्याप या प्रभागात पॅनल तयार झालेला नाही. माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांचे वास्तव्य असलेला हा प्रभाग आहे. त्यामुळे खा. दिलीप गांधी आणि अभय आगरकर यांच्या सहमतीने उमेदवार निश्चित करावे लागणार आहेत. इच्छुकांची संख्या जास्त असली तरी अद्याप या प्रभागात भाजपचा पॅनल तयार झालेला नाही. या प्रभागातून काहींचे भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच भाजपचा पॅनल समोर येणार आहे. सध्या तरी माजी उपमहापौर गीतांजली काळे या एकट्या मैदानात उतरल्या असून त्यांचा घरोघरी प्रचार सुरू आहे. दरम्यान पक्षाने दिलेल्या जागेवर निवडणूक लढविण्याची काळे यांची तयारी आहे. माजी सभापती सूर्यकांत खैरे यांच्या स्नुषा सुरेखा खैरे याही इच्छुक आहेत़ शिवसेनेचा पॅनल तयार झाला आहे. माजी सभापती सुवर्णा जाधव (ओबीसी महिला), अनिल शिंदे (सर्वसाधारण),विद्या दीपक खैरे (सर्वसाधारण महिला), प्रशांत गायकवाड (अनुसूचित जाती) असा पॅनल प्रचारात उतरला आहे. याशिवाय आणखी काही इच्छुक वाटेवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक विजय गव्हाळे (अनुसूचित जाती), हेमंत थोरात यांच्या पत्नी (ओबीसी महिला), नगरसेविका आशाबाई पवार (सर्वसाधारण महिला), दत्ता पंडितराव खैरे (सर्वसाधारण), निलेश बांगरे इच्छुक आहेत़ मनसेकडून नितीन भुतारे, श्याम वाकचौरे, ज्योती नांगरे, निर्भवने इच्छुक आहेत. काँग्रेसकडून मंगला भुजबळ, सविता कराळे, कांचन मोहिते, शुभम वाघ, संदीप गायकवाड यांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत. याशिवाय गणेश सातपुते, ऋषिकेश आगरकर हेही इच्छुक आहेत.आगरकर मळ््यामध्ये आधीच चांगले रस्ते होते. पाच वर्षात एकही रस्ता झाला नाही. पाच वर्षात फक्त दोन खड्डे बुजविण्याचे काम झाले. अशुद्ध पाण्याचा पुरवठा, अस्वच्छ प्रभागामुळे पाच वर्षात कावीळ, डेंग्यू असे साथीचे आजार प्रभागाला देण्याचे काम झाल्याच्या लोकभावना आहेत. रस्त्यांची वाट लागल्याने आदर्श समजला जाणारा प्रभाग शेवटच्या थराला गेला आहे, अशी टीका या प्रभागातील एका इच्छुकाने केली आहे.एकनाथनगर, सेंट थॉमस कॅथालिक चर्च, आगरकर मळा, खोकरनाला, विशाल कॉलनी, एकता कॉलनी, झेडपी कॉलनी, सागर कॉम्प्लेक्स, जयभीमनगर, संभाजी कॉलनी, शिवनेरी चौक, गौतमनगर, मुन्सीपल शाळा नंबर-४, अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसर, लक्ष्मीकृपा हौसिंग सोसायटी.

प्रभाग १५अ अनुसूचित जातीब नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)क सर्वसाधारण (महिला)ड सर्वसाधारण

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका