शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

नगर महापालिका पोटनिवडणूक : काँग्रेस, सेनेची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 6:49 PM

नगर महापालिका पोटनिवडणुकीचा धूमधडाका गुरुवारपासून सुरु झाला आहे. मनपाच्या माळीवाडा येथील जुन्या कार्यालयात बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

केडगाव : नगर महापालिका पोटनिवडणुकीचा धूमधडाका गुरुवारपासून सुरु झाला आहे. मनपाच्या माळीवाडा येथील जुन्या कार्यालयात बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लावली आहे.केडगावातील प्रभाग क्रमांक ३२ मधील नगरसेवक संदीप कोतकर यांचे नगरसेवकपद रद्द केल्याने एका जागेसाठी निवडणूक होत आहे. अशोक साबळे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. माळीवाडा येथील जुन्या मनपाच्या कार्यालयात बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र तीन उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. २० मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येणार आहे़ २१ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून २३ मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.काँग्रेसकडून या जागेसाठी विशाल कोतकर व गणेश सातपुते हे दोघे इच्छुक असून शिवसेनेकडून विजय पठारे व अजय अजबे हे दोन उमेदवार इच्छुक आहेत. भाजप या निवडणुकीत उतरणार की नाही याचा निर्णय अद्याप झाला नसल्याने सध्या त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. दरम्यान भाजपची खासदार दिलीप गांधी यांच्या समवेत बैठक झाली़ मात्र यात कोणताच निर्णय झाला नाही. शुक्रवारी भाजपची पुन्हा बैठक होणार असून यात निवडणुकीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

ज्या प्रभागात ही पोटनिवडणूक होत आहे, ती जागा काँग्रेसची आहे. यामुळे राष्ट्रवादीने येथे काँग्रेस उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.-भरत गारूडकर, केडगाव विभाग अध्यक्ष राष्ट्रवादी

खा. दिलीप गांधी यांच्या समवेत भाजपची बैठक झाली. दोन -तीन इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. मात्र याबाबत अंतिम निर्णय शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत होणार आहे.-शरद ठुबे, केडगाव भाजप मंडल अध्यक्ष

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका