Mohatadevi Trust funded Rs. Delivery of checks to District 2 | मोहटादेवी ट्रस्टने दिला ५१ लाखांचा निधी; जिल्हाधिका-यांकडे धनादेश सुपुर्द

मोहटादेवी ट्रस्टने दिला ५१ लाखांचा निधी; जिल्हाधिका-यांकडे धनादेश सुपुर्द

पाथर्डी : तालुक्यातील श्रीक्षेत्र जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने कोरोनाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ लाखांच्या मदतीचा धनादेश देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देवस्थान समितीचे अध्यक्ष अशोककुमार भिल्लारे, विश्वस्त दिवाणी न्यायाधीश सुशील देशमुख, तहसीलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, विश्वस्त अ‍ॅड.विजय वेलदे, अ‍ॅड.सुभाष काकडे, डॉ.ज्ञानेश्वर दराडे, अशोक दहिफळे, भीमराव पालवे, सरिता दहिफळे, आजिनाथ आव्हाड, सुधीर लांडगे, सतीश वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांच्यासह सवार्नुमते हा निर्णय घेण्यात आला आहे. या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे देवस्थानचे अध्यक्ष अशोककुमार भिल्लारे यांनी बुधवारी दुपारी सुपूर्द केला.
माऊली सेवा प्रतिष्ठान नांदगाव शिंगवे येथील मनगाव प्रकल्पातील मनोरुग्ण महिला व अनाथ मुलांच्या अन्नदानाकरीता एक महिनाभर पुरेल एवढ्या किराणा साहित्यासाठी ३ लाख ७ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र धामणे यांच्याकडे देण्यात आला. मोहटादेवी देवस्थानने यापूर्वी तालुका प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला पाचशे सॅनिटायझर बाटल्या व दोन हजार मास्कचे वाटप देखील केले होते. तालुका प्रशासनाच्या मदतीला तीन वाहने मनुष्यबळासह देण्यात आलेली आहेत.

Web Title: Mohatadevi Trust funded Rs. Delivery of checks to District 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.