The main source of the gang who produced a fake land document was arrested in the city | जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करणा-या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला नगरमध्यून अटक

जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करणा-या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला नगरमध्यून अटक

श्रीगोंदा : बेलवंडी शुगर व लोणीव्यंकनाथ येथील अंजनाबाई भिकाजीराव ढमढेरे ट्रस्टच्या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून एका टोळीने फसवणूक केली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार अन्सार शेख याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली.
अन्सार शेख हा नगर शहरातील माळीवाडा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता शेख याचा शोध घेऊन त्याला पकडले. श्रीगोंदा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अशा बनावट दस्तावेजांच्या आधारे खरेदी केलेली प्रकरणे मूळ मालकांनी फिर्याद दिल्यावर उघड झाली आहेत. गावठाण क्षेत्रावर, शासकीय जागेवर हक्क दाखवीत किंवा बºयाच दिवसापासून कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या लोकांच्या जमिनीवर डोळा ठेऊन अनधिकृतरित्या बनावट कागदपत्रे बनवून जमिनी लाटण्याचा गोरख धंदा अन्सार शेख करीत होता. या प्रकरणीतील इतर २३ आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी यंत्रणा सतर्क केली आहे.

Web Title: The main source of the gang who produced a fake land document was arrested in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.