लग्न सोहळ्यातून पैसे, दागिने चोरणारी मध्यप्रदेशातील टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 05:34 PM2021-02-17T17:34:55+5:302021-02-17T17:35:14+5:30

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात येऊन लग्न सोहळ्यातून पैसे व दागिने चोरणारी मध्यप्रदेश येथील सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. सात आरोपींना मध्यप्रदेश येथील पिपलीयॉ व देवास येथून अटक केली.

Madhya Pradesh gang arrested for stealing money and jewelery from wedding ceremony | लग्न सोहळ्यातून पैसे, दागिने चोरणारी मध्यप्रदेशातील टोळी जेरबंद

लग्न सोहळ्यातून पैसे, दागिने चोरणारी मध्यप्रदेशातील टोळी जेरबंद

Next

अहमदनगर : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात येऊन लग्न सोहळ्यातून पैसे व दागिने चोरणारी मध्यप्रदेश येथील सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. सात आरोपींना मध्यप्रदेश येथील पिपलीयॉ व देवास येथून अटक केली.

गोलू सुमेर झोजा उर्फ सिसोदिया (वय २५), संदीप सुमेर झोजा उर्फ सिसोदिया (वय १९), राधेशाम उदयराम राजपूत उर्फ ठाकूर (वय ३०), बिपीन राजपाल सिंग (वय २१), गिरिराज दिनेशचंद शुक्ला (वय २५), अनिल कमल सिसोदिया (वय ३० सर्व रा.जि. देवास मध्यप्रेदश), विशालकुमार बनी सिंग (वय १९रा.रोशननगर हरियाण) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या टोळीने १ डिसेंबर २०२० रोजी शिर्डी येथे लग्नसोहळ्यातून दीड लाख रुपये रोख चोरून नेले होते. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात अनिलकुमार उपाध्याय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: Madhya Pradesh gang arrested for stealing money and jewelery from wedding ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.