शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमधून एकही महिला खासदार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 4:02 PM

संसदीय राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी सर्वच पक्षांकडून होत असली तरी, आजवरच्या लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतल्याचे दिसते़

अण्णा नवथरअहमदनगर : संसदीय राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी सर्वच पक्षांकडून होत असली तरी, आजवरच्या लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतल्याचे दिसते़ अहमदनगरलोकसभा निवडणूक मैदानात अभिनेत्री दीपाली सय्यद वगळता एकाही निवडणुकीत महिलांना मैदानात उतरविलेले नाही़ यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अनुराधा नागवडे यांच्या नावाची चर्चा होती़ परंतु, त्यांचे नाव मागे पडले़ त्यामुळे यंदाही महिला खासदार होतील, याची सुतराम शक्यता नाही. राष्ट्रीय राजकारणात महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांचे जिल्ह्यातील नेते तोंड पाटीलकी करत असले तरी उमेदवारी वाटप करताना महिलांना संधी दिली गेली नाही़अहमदनगर जिल्ह्यातील आजवरच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली असता सन १९५१ पासून एकाही राजकीय पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नाही़ यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांचे नाव राष्ट्रवादीकडून मध्यंतरी पुढे आले होते़ परंतु, हे नावही आता मागे पडले आहे़ त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही महिलांना स्थान मिळेल, असे वाटत नाही़अहमदनगर लोकसभा आणि पूर्वीच्या नगर दक्षिण मतदारसंघातून एकाही राजकीय पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नाही़ अहमदनगर जिल्ह्याने राज्याला अनेक बडे नेते दिले़जिल्ह्यात विखे, गडाख, जगताप, नागवडे, राजळे, ढाकणे, काळे, कोल्हे, घुले यासारखी प्रमुख राजकीय घराणी आहेत़ त्यांच्याभोवतीच जिल्ह्याचे राजकारण फिरते़ यापैकी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा आहेत़ माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आहेत़शेवगाव- पाथर्डीच्या जनतेने मोनिका राजळे यांना विधानसभेत पाठविले़ आमदार स्नेहलता कोल्हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत़ याशिवाय महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींत महिलांना संधी दिली गेली़ पण संसदीय राजकारणातून महिलांना डावलले गेले़ या मतदारसंघात नेहमीच साखर सम्राटांचे वर्चस्व राहिले आहे़ मात्र, महिला उमेदवारांना अद्याप एकाही पक्षाकडून तिकीट दिले गेलेले नाही़८ लाख ७१ हजार महिला मतदारअहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १८ लाख ३१ हजार आहेत़ यापैकी ८ लाख ७१ हजार महिला मतदार आहेत़ महिलांची मते मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत़ परंतु, या मतदारसंघातून महिलांना उमेदवारी दिली गेली नसल्याचे दिसते़

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक