माणूस म्हणून जगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 02:27 PM2020-02-08T14:27:16+5:302020-02-08T14:27:58+5:30

अंतर्मुख झाले की चुका कशामुळे झाल्या, ते  कळू लागते. त्यात सुधारणा केल्या की समस्या सुटतात. स्वत:च्या समस्या या स्वत:च्या चुकीमुळे निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे त्या तो स्वत:च सोडवू शकतो, हा आत्मविश्वास स्वत:मध्ये येणे आवश्यक आहे.

Live as a man | माणूस म्हणून जगा

माणूस म्हणून जगा

Next

अध्यात्म/राजाभाऊ कोठारी, मंगल भक्त सेवा मंडळाचे प्रमुख, अहमदनगर.
आजकाल प्रत्येकाला वेगवेगळ््या समस्या आहेत. मात्र या समस्या कोण निर्माण करतो? तर स्वत:कडून झालेल्या ज्या काही चुका असतात, त्यामुळेच समस्या निर्माण झालेल्या असतात. त्यासाठी प्रत्येकाने अंतर्मुख होणे गरजेचे आहे. अंतर्मुख झाले की चुका कशामुळे झाल्या, ते  कळू लागते. त्यात सुधारणा केल्या की समस्या सुटतात. स्वत:च्या समस्या या स्वत:च्या चुकीमुळे निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे त्या तो स्वत:च सोडवू शकतो, हा आत्मविश्वास स्वत:मध्ये येणे आवश्यक आहे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी दुसरा-तिसरा कोणी येणार नाही. समस्या सुटण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. तेच काम सध्याच्या काळात महत्त्वाचे आहेत. घरातील एक मुलगा वाईट मार्गावर गेला तर अख्खे कुटुंबाचे जीवन विस्कळीत होते. म्हणून तरुणांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. ‘जेथे कमी- तेथे कुवतीनुसार आम्ही’ हे ब्रीद घेऊन मंगल भक्त सेवा मंडळ गेल्या ३० वर्षांपासून काम करीत आहे. हेच काम प्रत्येकाने केले पाहिजे. वर्षभरात ५४ उपक्रम राबविले जातात. नापासांशी शाळा, आरोग्यासाठी ८० गावे दत्तक, आरोग्य शिबिरे, हनुमान चालिसा आदी कार्यक्रमातून तरुणांना विधायक मार्गावर आणण्याचे व्रत अंगीकारले आहे. दत्त म्हणजे देण्याचे काम करतात. घेण्याचे नव्हे. म्हणून देण्याची प्रेरणा निर्माण झाली तर समाजातील अनेक प्रश्न सुटतील. आपण माणूस म्हणून जगतो आहोत याची जाणीव पदोपदी होणे आवश्यक आहे. माणूस असल्याची प्रचिती आपल्या वाणीतून, कृतीमधून सिद्ध झाली पाहिजे. आपण स्वत:पुरता विचार न करता आवतीभोवती असलेल्या प्रत्येकाचा विचार केला पाहिजे. आपण सारे मानव योनीत आहोत. माणसाचे गुणधर्म आपल्याकडे आहेत, का हेच आपल्याकडून सिद्ध झाले पाहिजे. आणि असे झाले तर व्यक्तीच्या, समाजाच्या समस्या शून्य व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून प्रत्येक समस्यांचे उत्तर आपल्याकडेच असतात. अंतमुर्ख होऊन विचार केला. चुका सुधारल्या तर जीवनात कोणीतीही अडचतण निर्माण होणार नाही. 

 

Web Title: Live as a man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.