लोकसहभागातून निंबळक येथे उभारले कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:21 AM2021-05-14T04:21:40+5:302021-05-14T04:21:40+5:30

निंबळक : निंबळक (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोविड केअर सेंटर उभारले आहे. यासाठी ...

Kovid Center set up at Nimbalak with public participation | लोकसहभागातून निंबळक येथे उभारले कोविड सेंटर

लोकसहभागातून निंबळक येथे उभारले कोविड सेंटर

Next

निंबळक : निंबळक (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोविड केअर सेंटर उभारले आहे. यासाठी गावातील ग्रामस्थ मदत करण्यासाठी पुढे आले. मातोश्री नावाने हे कोविड सेंटर सुरू केले आहे.

निंबळक येथे कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनामुळे येथे पंचवीस ते तीस कुटुंबांतील प्रमुख व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. या गावातील नागरिक मध्यमवर्गातील आहे. एमआयडीसी येथे काम करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या कुटुंबाच्या घरात कोरोना रुग्ण आढळला तर नगरमध्ये उपचार करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ऑक्सिजन बेडही उपलब्ध होत नाही. यामुळे घरातील कुटुंब प्रमुखाचा जीवही गमवावा लागला. आपल्या गावातील नागरिकांसाठी मोफत कोविड सेंटर सुरू करण्यासाठी येथील युवा उद्योजक दादा साठे, युवा नेतृत्व केतन लामखडे, गावातील वैद्यकीय डॉक्टर, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी गावातील राजकारण, मतभेद विसरून जनतेसाठी पुढाकार घेऊन डॉ. अजय गायकवाड यांच्या मंगल कार्यालयामध्ये ५० बेडचे कोविड सेंटर सुरू केले. इसळक, निंबळक, खारेकर्जुने येथील कोरोना रुग्णासाठी येथे सोय केली.

गावातील तरुणांनी गावासाठी पुढाकार घेऊन कोविड सेंटर सुरू झाल्याचे समजताच गावामधून मदतीचा ओघ सुरू झाला. गावातील ग्रामस्थांनी आपल्या पारिस्थितीनुसार मदत करण्यास सुरुवात केली. सरपंच, उपसरपंचसह ग्रामपंचायत सदस्यही मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी जमा करण्यासाठी हातभार लावत आहेत. रोख स्वरूपात रक्कम, किराणा मदत मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. काही ग्रामस्थांनी पाण्याच्या बॉटल, अंडी, मांस, गॅस टाकी अशा प्रकारे मदत करण्यास सुरुवात केली. सध्या तेरा रुग्ण येथे उपचार घेत आहेत. दररोज सकाळी योगा घेतला जातो. सकाळी नाष्ट्याला अंडी, दुपारी, संध्याकाळी जेवण दिले जाते. लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेमधून रुग्णाच्या उपचारासाठी औषधे विकत घेऊन दिली जातात. गावामध्ये सहा रुग्णालये आहेत.

---

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आवाहन..

कोरोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी घरात न थांबता या कोविड केअर सेंटरमध्ये येऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन निंबळकचे सरपंच प्रियंका लामखडे, इसळक सरपंच छाया गेरंगे यांनी केले आहे. प्रशासनाने या सेंटरसाठी औषधोपचाराची मदत करावी, अशी मागणी अजय लामखडे यांनी केली. रवींद्र पवार, इक्बाल पटेल, दादा झावरे, बापू कोतकर, अजिंक्य कदम, हरीश कळसे, चंदू कोतकर, कानिफनाथ कोतकर, संतोष मगर, मयूर झोडगे, अजय कोतकर, अविनाश टकले, कैलास सासवडे रुग्णसेवा करत आहेत.

Web Title: Kovid Center set up at Nimbalak with public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.