शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

लांडे खून प्रकरणात कोतकर बंधुंना जामीन; जिल्हाबंदीची अट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 6:22 PM

शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात माजी महापौर संदीप व त्याचा भाऊ सचिन भानुदास कोतकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्तीवर सोमवारी (दि़१३) जामीन मंजूर केला आहे.

अहमदनगर : शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात माजी महापौर संदीप व त्याचा भाऊ सचिन भानुदास कोतकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्तीवर सोमवारी (दि़१३) जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी झाली. अशोक भीमराज लांडे यांना १९ मे २००८ रोजी केडगावमध्ये अमानुष मारहाण करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शंकरराव राऊत यांनी न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार  कोतवाली पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१३ मध्ये आरोपी भानुदास कोतकर, त्याचे मुले संदीप, सचिन आणि अमोल व इतर साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला नाशिक न्यायालयात वर्ग करण्यात आला. नाशिक जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन सहा जणांना दोषी ठरवण्यात आले.  यामध्ये काँग्रेसचा तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, नगरचे माजी महापौर संदीप कोतकर, सचिन व अमोल या चौघांना जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. भानुदास कोतकर याला उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. त्यापाठोपाठ अमोल कोतकर यालाही जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर माजी महापौर संदीप आणि सचिन यांनी ही अ‍ॅड़ अभय ओस्तवाल (औरंगाबाद) यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. ओस्तवाल यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. जामीन कालावधीत या दोघांना जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCourtन्यायालय