कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 09:36 AM2017-11-22T09:36:50+5:302017-11-22T10:51:17+5:30

कोपर्डी खटल्यातील दोषी क्रमांक तीन नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अाहेर यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली अाहे. अाहेर यांनी दोषींना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती.

Kopardi case : accused lawyer threatens to kill | कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी

Next

संगमनेर(अहमदनगर) - कोपर्डी खटल्यातील दोषी क्रमांक तीन नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अाहेर यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली अाहे. अाहेर यांनी दोषींना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. यावर ''बुधवारी न्यायालयात दोषीला फाशीच द्या असे सांगा, अन्यथा जीवे मारू'' अशी धमकी प्रकाश आहेर यांनी देण्यात आली अाहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात अाहेर यांनी तक्रार दाखल केली अाहे. ही धमकी फोनवरुन मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची आज सुनावली जाणार आहे. शिक्षेच्या सुनावणीनिमित्त अहमदनगर कोर्टाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या खटल्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप की फाशी हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान,  सुनावणीवेळी कोर्ट परिसरात मोठी गर्दी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.  

कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी नको, जन्मठेप द्या, दोषींच्या वकिलांची विनंती
कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या खटल्यात मंगळवारी दोन दोषींच्या वकिलांनी शिक्षेवर युक्तिवाद केला. जितेंद्र शिंदेच्या वकिलाने फाशीऐवजी जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली. तर नितीन भैलुमे याच्या वकिलाने कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली. बुधवारी संतोष भवाळचे वकील व सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. उज्ज्वल निकम शिक्षेबाबत युक्तिवाद करतील.
शिंदे याच्या वतीने योहान मकासरे, तर भैलुमे याच्या वतीने प्रकाश आहेर यांनी युक्तिवाद केला. मकासरे म्हणाले, शिंदे याला पत्नी व आई-वडील आहेत.त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे़ ही बाब विचारात घेऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी.

न्यायालयाने जितेंद्र शिंदे यास शिक्षेबाबत काही बोलायचे आहे का, अशी विचारणा केली. त्यावर, आपण त्या मुलीला मारलेच नाही, दुसरेच कुणीतरी मारले आहे. शिक्षा एक दिवस काय आणि हजार दिवसांची काय, असे उत्तर त्याने दिले.
मी निर्दोष आहे - भैलुमे
नितीन भैलुमे याला समोर बोलावून शिक्षेबाबत न्यायालयाने विचारले, तेव्हा त्याने ‘मी निर्दोष आहे’ एवढेच सांगितले. त्याच्या डोळ्यात पाणी आले होते.

काय आहे नेमकं प्रकरण?
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. जलदगती न्यायालयात सुनावणी करुन आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.

Web Title: Kopardi case : accused lawyer threatens to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.