फडणवीस यांच्याकडून कोल्हे यांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:18 AM2021-01-22T04:18:47+5:302021-01-22T04:18:47+5:30

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विवेक कोल्हे यांनी उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन काम करण्याची ...

Kolhe's appreciation from Fadnavis | फडणवीस यांच्याकडून कोल्हे यांचे कौतुक

फडणवीस यांच्याकडून कोल्हे यांचे कौतुक

Next

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विवेक कोल्हे यांनी उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन काम करण्याची जिद्द यामुळेच ३२ पैकी २२ ग्रामपंचायतींमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांचे हे यश युवकांना निश्चितच प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील मिळालेल्या यशानंतर युवा नेते विवेक कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी विवेक कोल्हे यांचे कौतुक करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या. राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश संपादन केले आहे.

....

फोटो२१- विवेक कोल्हे गौरव - कोपरगाव

===Photopath===

210121\img-20210120-wa0071.jpg

===Caption===

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांचा पुष्पगुच्छ देउन गौरव केला.

Web Title: Kolhe's appreciation from Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.