शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

केडगाव शिवसैनिकांच्या हत्येशी राजकीय नेत्यांचा संबंध नाही- विशाल कोतकरची पोलिसांना माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:16 PM

रवी खोल्लमच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी पाठविलेल्या संदीप गुंजाळ यानेच परस्पर दोघा शिवसैनिकांची हत्या केली. या घटनेशी कोणत्याही राजकीय नेत्यांचा संबंध नाही, अशी माहिती केडगाव दुहेरी हत्याकांडाचा केंद्रबिंदू ठरलेल्या नगरसेवक विशाल कोतकर याने पोलिसांना दिली.

अहमदनगर : रवी खोल्लमच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी पाठविलेल्या संदीप गुंजाळ यानेच परस्पर दोघा शिवसैनिकांची हत्या केली. या घटनेशी कोणत्याही राजकीय नेत्यांचा संबंध नाही, अशी माहिती केडगाव दुहेरी हत्याकांडाचा केंद्रबिंदू ठरलेल्या नगरसेवक विशाल कोतकर याने पोलिसांना दिली.कोतकर याला विशेष पथकाने मंगळवारी पहाटे कामरगाव (ता. नगर) परिसरातून अटक केली. दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रवी खोल्लम याची पोलीस कोठडी मंगळवारी संपत होती. त्यामुळे त्यालाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यालाही २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांनी दिला आहे.केडगाव येथे ७ एप्रिल रोजी सेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने हत्या केली. या घटनेनंतर गुंजाळ पोलिसांत हजर झाला. विशाल कोतकर फरार होता. या हत्याकांडाचा सूत्रधार म्हणून विशाल याचे नाव समोर आले. एलसीबीची टीम त्याचा शोध घेत होती. अखेर त्याला अटक झाली. पोलिसांनी पकडताच विशाल याने हत्याकांडाचा घटनाक्रम सांगितला. ७ एप्रिल रोजी संजय कोतकर व रवी खोल्लम यांच्यामध्ये फोनवरून बोलताना वाद झाला होता. खोल्लम याने ही बाब विशाल कोतकरला सांगितली होती. त्यामुळे विशाल कोतकरने गुंजाळ याला खोल्लमच्या घरी प्रकरण मिटविण्यासाठी पाठविले. त्यावेळी खोल्लमच्या घरी गुंजाळ याची संजय कोतकर, वसंत ठुबे यांची भेट झाली़ तेथे संजय कोतकर आणि गुंजाळ यांच्यात वाद झाला. राग अनावर झाल्याने गुंजाळ याने स्वत:कडील गावठी कट्ट्यातून कोतकर आणि ठुबे यांना गोळ्या झाडून व गुप्तीने वार करून मारले. कोतकर व ठुबे यांना मार, असे मी अथवा इतर कोणीही गुंजाळ याला सांगितले नव्हते, अशी माहिती विशाल कोतकर याने पोलिसांना दिली आहे. विशाल कोतकर याने दिलेल्या जबाबातील माहिती पडताळून पाहण्यात येत आहे.

हत्याकांडापूर्वी भानुदास कोतकरच्या घरी बैठक

संजय कोतकर याने रवी खोल्लम याला फोन करून शिवीगाळ केल्याची बाब विशाल कोतकर याला सांगितली. विशाल कोतकर खोल्लमला घेऊन केडगाव येथील भानुदास कोतकर याच्या घरी गेला. तेव्हा भानुदास कोतकर तेथे नव्हता़ भानुदास कोतकर याची सून सुवर्णा यांनी भानुदास कोतकर याला फोन केला. त्यांच्या घरात झालेल्या बैठकीत नेमके काय घडले. याचा शोध पोलीस घेत आहेत, असे सरकारी पक्षाच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. दरम्यान हत्याकांड घडल्यानंतर पोलिसांनी भानुदास कोतकर याच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र फुटेजचे डीव्हीआर गायब झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांकडून ८० जणांची चौकशी

केडगाव हत्याकांडातील संशयित आरोपींच्या संपर्कात आलेल्या ८० जणांची विशेष पथकाने आतापर्यंत चौकशी केली आहे़ यातील विशाल कोतकर, रवी खोल्लम, संदीप गुंजाळ यांना फोन करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

या नऊ जणांना अटक

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर, भानुदास ऊर्फ बी. एम. कोतकर, रवी खोल्लम, संदीप गि-हे, महावीर मोकळे, बाबासाहेब केदार, विशाल कोतकर अशा ९ जणांना अटक केली आहे.

 

टॅग्स :Kedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडAhmednagarअहमदनगरShiv Senaशिवसेना