Kashtari entrepreneur Popatrao Mane dies in accident | काष्टीचे उद्योजक पोपटराव माने यांचे अपघाती निधन 
काष्टीचे उद्योजक पोपटराव माने यांचे अपघाती निधन 

काष्टी : काष्टी येथील शिवनेरी हॉटेलचे संचालक पोपटराव विलासराव माने (वय ४५) यांचे अपघाती निधन झाले. ते रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करुन घरी जात असताना नगर-दौड रस्ता ओलांडत असताना त्यांना दौंडकडून येणा-या पिकअप वाहनाने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. 
पोपटराव माने हे काष्टीचे माजी सरपंच शितल माने यांचे पती होते. अतिशम मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जोडला होता. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पोपट माने यांच्या निधनाने काष्टी परिसरात शोककळा पसरली आहे. 
नगर-दौंड रोड रोडचे काँक्रीटीकरण झाले आहे. पण या रस्त्यावरून जाणा-या वाहनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रविवारी पहाटे बेलवंडी फाट्यावर बेवारस कार आगीत खाक झाली. रविवारी संध्याकाळी मढेवडगाव शिवारात एका मारुती कारवर मोटारसायकल येऊन आदळली. रात्री काष्टीत पीकअपने पोपट मानेचा बळी घेतला. तर रात्री घारगाव शिवारात एक पीकअप उलटला आहे. यात मात्र कोणीही जखमी झाले आहे. 
 

Web Title: Kashtari entrepreneur Popatrao Mane dies in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.