शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

Lok Sabha Election 2019: लोकसभेच्या रणांगणात आपचीही उडी : अहमदनगरची जागा लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:44 AM

अहमदनगर लोकसभेच्या मैदानात भाजप, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता आम आदमी पार्टीनेही उडी घेतली आहे़

अहमदनगर : अहमदनगर लोकसभेच्या मैदानात भाजप, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता आम आदमी पार्टीनेही उडी घेतली आहे़ लवकरच आपचा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होईल, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष तनवीर बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़शुक्रवारी आपच्या पदाधिकाऱ्यांची नगरमध्ये बैठक झाली़ या बैठकीत नगरची जागा लढविण्यासंदर्भात बैठक झाली़ दिल्लीचे मुख्यमंत्री व पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत केलेली विकास कामे जनतेसमोर ठेवून नगरमध्येही आप मतांचा जोगवा मागणार आहे़ लोकसभा निवडणुकीसाठी प्रामुख्याने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला़ तसेच इच्छुक नावांवर चर्चा करुन लवकरच उमेदवाराची घोषणा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला़ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपने महाराष्ट्रात उमेदवार उभे केले होते. अहमदनगर लोकसभेसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी निवडणूक लढविली होती़ सय्यद यांना अवघी ७ हजार मते मिळाली होती़ मात्र, या वर्षी दीपाली सय्यद निवडणूक लढवणार नाहीत़ त्यामुळे आप सय्यद यांच्याऐवजी अन्य उमेदवारांच्या शोधात आहे़तीन नावांवर चर्चाआपकडून अहमदनगरच्या जागेसाठी अ‍ॅड. जावेद काझी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती कमल सावंत, माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश शेलार यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, अद्याप कोणाचेही नाव अंतिम झालेले नाही़ त्यामुळे आपकडून कोणाला उमेदवारी मिळते आणि कोण प्रत्यक्ष निवडणूक लढण्यासाठी तयार होतं हे लवकरच स्पष्ट होईल.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर