शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बदल्यांच्या ढोबळ फेरीला कनिष्ठ शिक्षकांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:44 PM

श्रीरामपूर : जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी पात्र शिक्षकांकडून २० शाळांच्या पसंतीक्रमाचे आॅनलाईन अर्ज २३ आॅक्टोबरअखेर भरले जाणार आहेत. या पसंतीक्रमामध्ये ज्येष्ठांकडून खो मिळाल्यास कनिष्ठ शिक्षक वगळले जाण्याची भीती निर्माण निर्माण झाली आहे. त्यामुळे कनिष्ठ शिक्षकांनी बदल्यांच्या ढोबळ फेरीला आक्षेप घेतला आहे.जिल्ह्यात १० हजारांच्यावर प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील सुमारे ६ हजार शिक्षक बदलीस ...

श्रीरामपूर : जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी पात्र शिक्षकांकडून २० शाळांच्या पसंतीक्रमाचे आॅनलाईन अर्ज २३ आॅक्टोबरअखेर भरले जाणार आहेत. या पसंतीक्रमामध्ये ज्येष्ठांकडून खो मिळाल्यास कनिष्ठ शिक्षक वगळले जाण्याची भीती निर्माण निर्माण झाली आहे. त्यामुळे कनिष्ठ शिक्षकांनी बदल्यांच्या ढोबळ फेरीला आक्षेप घेतला आहे.जिल्ह्यात १० हजारांच्यावर प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील सुमारे ६ हजार शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत. अंतिम मुदत दिल्याने शेवटच्या टप्प्यात सर्वरवर ताण पडून वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर तपासणी क रून अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऐन दिवाळीत बदल्यांचे अर्ज भरणे शिक्षकांसाठी कंटाळवाणे ठरले आहे.सेवा ज्येष्ठ शिक्षकांनी खो दिल्यास अनेक शिक्षक पसंतीक्रमातून बाद ठरणार आहेत. शिक्षण विभाग देईल त्या शाळेवर हजर होण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर शिल्लक राहणार नाही. त्यातून अनेकांची गैरसोय होणार आहे. त्याऐवजी पुन्हा पसंतीची फेरी घेत कनिष्ठ शिक्षकांची नाराजी टाळता येणार आहे. तसे झाल्यास त्यास कुणाचाही आक्षेप राहणार नाही, असे कनिष्ठ शिक्षकांचे म्हणणे आहे. शिक्षक संघटनांकडेदेखील अनेक कनिष्ठांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र, संघटनांच्या नेत्यांमध्ये ज्येष्ठांचाच भरणा अधिक असल्याने ही बाब गांभीर्याने घेतली गेली नाही. त्यामुळे कनिष्ठ शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :AhmadnagarअहमदनगरTeacherशिक्षकTransferबदली