जामखेडला दरोडा, दोन लाखासह 22 तोळे सोने लुटले, मिरजगावलाही दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 09:43 AM2020-06-24T09:43:59+5:302020-06-24T09:44:21+5:30

जामखेड ( जि. अहमदनगर)  :  येथील पोकळे वस्तीवर तात्याराम पोकळे यांच्या घरावर बुधवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. दोन लाख ...

Jamkhed was robbed, 22 lakhs of gold including two lakhs were looted | जामखेडला दरोडा, दोन लाखासह 22 तोळे सोने लुटले, मिरजगावलाही दरोडा

जामखेडला दरोडा, दोन लाखासह 22 तोळे सोने लुटले, मिरजगावलाही दरोडा

Next

जामखेड ( जि. अहमदनगर)  :  येथील पोकळे वस्तीवर तात्याराम पोकळे यांच्या घरावर बुधवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला.

दोन लाख रुपये रोख व 22 तोळे सोने असा  ऐवज  चोरट्यांनी लंपास केला.  जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक सुरेश माने,अमरजित मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेनंतर जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.  श्वान पथक, फिंगर प्रिंट  पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

रात्री एक ते तीनच्या सुमारास ही चोरी झाली.  दरोडेखोरांनी पाठीमागचा दरवाजा कटावनीच्या सहाय्याने तोडला आणि ते आत घुसले. सर्व झोपेत असतानाच ही चोरी झाली.  तात्याराम यांच्या आई पहाटे ऊठल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर ही चोरी लक्षात आली.

 

मिरजगावलाही दरोडा

मिरजगाव : येथील शिंगवी काॅलनीतील अॅड.मधुकर विठ्ठल कोरडे यांच्या घरावर दरोडा पडला. यात तीन लाखांचा ऐवज लंपास झाला.  जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, गृहविभागाचे उप अधिक्षक प्राजंली सोनवणे, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक सुरेश माने,अमरजित मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली.  या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून श्ववन पथक,फिंगरपिट पथकाला पाचारण केले आहे

Web Title: Jamkhed was robbed, 22 lakhs of gold including two lakhs were looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.