Jallosh in Chandanapur, the hometown of Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे यांच्या मूळगावी चंदनापुरीत भारताच्या विजयाच्या जल्लोष 

अजिंक्य रहाणे यांच्या मूळगावी चंदनापुरीत भारताच्या विजयाच्या जल्लोष 

संगमनेर : तीन दशकानंतर भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियासोबत कसोटी मालिका जिंकली आहे. या विजयाचा रहाणे यांच्या मूळगावी चंदनापुरी (ता. संगमनेर) येथे  किक्रेटप्रेमींनी जल्लोष केला.

 भारतीय क्रिकेट संघाचा  कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या वयोवृद्ध आजीला व राहणे कुटुंबीयांनी एकमेकांना पेढे भरविले. ग्रामस्थांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला. नगर जिल्ह्यातही भारताच्या विजयानंतर फटाके फोडण्यात आले.

Web Title: Jallosh in Chandanapur, the hometown of Ajinkya Rahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.