शहरं
Join us  
Trending Stories
1
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
2
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
3
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
4
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
5
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
6
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
7
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
8
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
9
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
10
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
11
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
12
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
13
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
14
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
15
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
17
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
18
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
19
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

श्रीगोंद्यातील ‘त्या’ चौघांच्या हत्येचे जळगाव कनेक्शन.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 1:06 PM

सुरेगाव येथील चौघांची  विसापूर फाट्याजवळ गुरुवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली.  या हत्याकांडप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात सुरेगाव येथील पाच, सहा जणांच्या विरोधात गुन्हा केला आहे. मात्र हे हत्याकांड स्वस्तात सोने देण्याच्या वादातून जळगाव जिल्ह्यातील चौघांनी केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

श्रीगोंदा : सुरेगाव येथील चौघांची  विसापूर फाट्याजवळ गुरुवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली.  या हत्याकांडप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात सुरेगाव येथील पाच, सहा जणांच्या विरोधात गुन्हा केला आहे. मात्र हे हत्याकांड स्वस्तात सोने देण्याच्या वादातून जळगाव जिल्ह्यातील चौघांनी केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत.

      जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश यादव पोलिस उपअधीक्षक संजय सातव व पोलीस निरीक्षक अरविंद माने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी श्रीगोंद्यात तळ ठोकला आहे. 

      सुरेगाव येथील नातीक कुंजीलाल चव्हाण ( वय ४०), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (वय ३५), नागेश कुंजीलाल चव्हाण ( वय १४),   लिंब्या हाबºया काळे (वय २२) या चौघांच्या हत्या प्रकरणी अक्षदा कुंजीलाल चव्हाण हिने दिलेल्या फिर्यादीवरून आक्षय उंबºया काळे व मिथुन उंबºया काळे (रा.सुरेगाव, ता. श्रीगोंदा) इतर पाच, सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपी फरार झाले आहेत. 

दरम्यान, मयत झालेल्या व्यक्तींनी गुरुवारी चार वाजण्याच्या विसापूर फाट्याजवळ जळगाव येथील धनिकांना स्वस्तात सोन्याचे दाखवून बोलविले. ते ठरल्याप्रमाणे आले.  चौघांनी पैशांची मागणी केली. पैशाची बॅग हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावर जळगावमधील धनिकांतील एकाने चौघांवर चाकू हल्ला केला आणि चौघांना जागीच ठार करून जळगाव दिशेने निघून गेले.  ज्या ठिकाणी चौघांची हत्या करण्यात आली. त्या ठिकाणी मयत व आरोपीत झटापट झाली. एका जळगाव येथील आरोपीचे एटीएम कार्ड घटनास्थळी पडले होते. ते एटीएम कार्ड पोलिसांच्यशी हाती लागले असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाCrime Newsगुन्हेगारीMurderखून