इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर आज न्यायालयात सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 11:40 AM2020-07-03T11:40:43+5:302020-07-03T11:42:05+5:30

समाजप्रबोधनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्याविरोधात शुक्रवारी (१९ जून) संगमनेर न्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक  कायद्यान्वये फिर्याद दाखल करण्यात होती. या प्रकरणाची पहिली सुनावणी शुक्रवारी (३ जुलै) होणार आहे. 

Indorikar Maharaj's controversial statement will be heard in court today | इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर आज न्यायालयात सुनावणी

इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर आज न्यायालयात सुनावणी

googlenewsNext

संगमनेर : समाजप्रबोधनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्याविरोधात शुक्रवारी (१९ जून) संगमनेरन्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक  कायद्यान्वये फिर्याद दाखल करण्यात होती. या प्रकरणाची पहिली सुनावणी शुक्रवारी (३ जुलै) होणार आहे. 

  स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते..असे विधान इंदोरीकर महाराजांनी केले होते. या विधानामुळे त्यांच्याविरोधात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक  कायद्यान्वये संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भवर यांनी फिर्याद दिली होती. 

 अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुराव्यानिशी इंदोरीकर महाराज यांच्याविषयी तक्रार केली होती. या तक्रारीवरून फिर्याद दाखल करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सांनी आदेश दिले होते. यावर आज पहिली सुनावणी होत आहे.

Web Title: Indorikar Maharaj's controversial statement will be heard in court today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.