मुळा धरणातून विसर्ग वाढविला; पारनेर भागातून पाण्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:08 PM2020-09-09T13:08:54+5:302020-09-09T13:09:49+5:30

 राहुरी: दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा मुळा धरणाकडे पारनेर भागातून पावसाच्या पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आज दुपारपासून मुळा धरणाचा कडून जायकवाडीकडे चार हजार क्‍युसेकने अकरा मोरयाद्वारे विसर्ग सुरू झाला आहे.

Increased radiance from the radish dam; Water inflow from Parner area | मुळा धरणातून विसर्ग वाढविला; पारनेर भागातून पाण्याची आवक

मुळा धरणातून विसर्ग वाढविला; पारनेर भागातून पाण्याची आवक

googlenewsNext

 राहुरी: दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा मुळा धरणाकडे पारनेर भागातून पावसाच्या पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आज दुपारपासून मुळा धरणाचा कडून जायकवाडीकडे चार हजार क्‍युसेकने अकरा मोरयाद्वारे विसर्ग सुरू झाला आहे.

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या पारनेर भागातून गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाण्याची आवक सुरू आहे. कालपासून पाण्याची आवक वाढली आहे .त्यामुळे मुळा धरणात पाण्याचा साठा वाढू लागला आहे.

25 हजार 400 दशलक्ष घनफूट पाणीसाठा कायम ठेवून मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. हरिश्चंद्रगड परिसरामध्ये पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कोतुळ येथून केवळ 705 क्‍युसेकने आवक सुरू आहे. आज मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर सायंकाळी आणि लाभ क्षेत्रावर पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली आहे. मुळा धरणातून आत्तापर्यंत 1100 दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडी कडे गेले आहे.

Web Title: Increased radiance from the radish dam; Water inflow from Parner area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.