...असे घडले श्रीगोंदा तालुक्यातील चौघांचे हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 04:08 PM2020-08-24T16:08:30+5:302020-08-24T16:08:59+5:30

विसापूर फाट्यावरील चौघांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी नरेश ऊर्फ बाळा जगदीश सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या इतर चार आरोपींनाही पोलिसांनी जळगाव येथून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने नरेश सोनवणेला तीन दिवसाची पोल्ीास कोठडी दिली आहे. 

... This is how the murder of four people in Shrigonda taluka happened | ...असे घडले श्रीगोंदा तालुक्यातील चौघांचे हत्याकांड

...असे घडले श्रीगोंदा तालुक्यातील चौघांचे हत्याकांड

googlenewsNext

श्रीगोंदा : विसापूर फाट्यावरील चौघांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी नरेश ऊर्फ बाळा जगदीश सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या इतर चार आरोपींनाही पोलिसांनी जळगाव येथून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने नरेश सोनवणेला तीन दिवसाची पोल्ीास कोठडी दिली आहे. 

विसापूर फाट्यावर स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून जळगाव येथील पाच जणांना सुरेगाव येथील टोळीने सुमारे तीन लाखांची कॅश बॅग हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावर नरेश सोनवणे याने या टोळीवर चाकूने प्रतिहल्ला केला. त्यात नातीक कुंजीलाल चव्हाण (वय ४०), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (वय ३५), नागेश कुंजीलाल चव्हाण ( वय १४), लिंब्या हाबºया काळे (वय २२) हे मारले गेले. अन्य साथीदार पळून गेले. त्यामुळे ते वाचले.


असे घडले हत्याकांड
 सुरेगाव शिवारातील दोघांनी नरेंद्र सोनवणे याला मोबाईल व्हिडीओ कॉल करून सोन्याच्या अंगठ्या नाणी दाखवून पाऊण किलो सोने विकायचे असे सांगितले. त्यावर नरेंद्र व त्याचा साथीदार एक गाडी घेऊन विसापूर फाट्यावर १६ आॅगस्टला आले. दोघांनी त्यांना बनावट सोन्याची नाणी, अंगठ्या दाखविल्या. खात्री व्हावी यासाठी सोन्याचे एक नाणे दिले. त्यावर नरेंद्र त्यांना ५०० रुपये दिले. नरेंद्र याने हे नाणे जळगावला नेले. एका सराफाकडे दिले. ९ हजार ५०० रुपये मिळाले. त्यावर सोने खरे आहे म्हणून खात्री झाली.  

नरेश सोनवणे, आशा सोनवणे, कल्पना सपकाळ, किशोर सपकाळ, प्रेमराज पाटील, योगेश ठाकूर एका गाडीतून विसापूर फाट्यावर आले. स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसविणारी टोळी दडी धरून बसली होती. सोने न देता तीन लाखाची कॅश असलेली बॅग त्यांनी हिसकावून घेतली. एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबड्याचा प्रयत्न केला. नरेशने बचावासाठी चौघांवर चाकूचा प्रतिहल्ला केला. त्यात चौघेही ठार झाले. 
....

Web Title: ... This is how the murder of four people in Shrigonda taluka happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.