शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

शेततळ्यात आणखी किती बळी? : आठवडाभरात १० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 5:33 PM

पाणी साठवून शेती फुलविण्यासाठी उभारलेली शेततळी आता शेतकरी कुटुंबांसाठीच कर्दनकाळ ठरू लागली आहेत.

गोरख देवकरअहमदनगर : पाणी साठवून शेती फुलविण्यासाठी उभारलेली शेततळी आता शेतकरी कुटुंबांसाठीच कर्दनकाळ ठरू लागली आहेत. गत आठवडाभरातील विविध ठिकाणच्या चार घटनांमध्ये तब्बल १० जणांना मृत्युचा सामना करावा लागला आहे. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे शेततळ्यात बुडून आणखी किती मृत्यू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.कृषी विभागाच्या विविध योजनांमुळे जिल्हाभर मोठ्या संख्येने शेततळ्यांची निर्मिती झाली. विशेषत: अनेक शेतकऱ्यांनी पदरमोड करून मोठ-मोठी शेततळी उभारली. काहींनी या शेततळ्यांच्या सुरक्षेसाठी कुंपण उभारले. काहींनी मात्र कोणत्याही प्रकारचे कुंपण उभारले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेततळ्यात कुत्रे, जनावरे पडून मरण्याच्या घटना सर्रास घडतात. यामध्ये अनेकदा प्लॅस्टिकचा कागद फाटतो. मात्र तरीही काही शेतकरी कुंपण उभारण्यास टाळाटाळ करतात. आता तर शाळकरी मुले, मुली, महिला शेततळ्यात बुडून मृत्यू पावल्याचा घटना घडू लागल्या आहेत. गत आठवड्यात चार घटनांमध्ये शेततळ्यात बुडून १० जणांचा मृत्यू झाला आहे. ६ जूनला ढवळपुरी (ता. पारनेर) येथे पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा तर १५ जूनला अरणगाव (ता. नगर) येथे दोन मुलांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.१६ जूनला घुमरी (ता. कर्जत) येथे धुणे धुण्यासाठी आईसह दोन मुली शेततळ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी एक मुलगी पाय घसरून शेततळ्यात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरी मुलगी व आईचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. १७ जूनला घारगाव (ता. श्रीगोंदा) येथे आईसह मुलगी जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यावर गेली होती. आई दोरीच्या सहायाने शेततळ्यातून हंड्याने पाणी काढत होती. त्यावेळी दोरी तुटून आई पाण्यात पडली. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलगीही पाय घसरून पाण्यात पडली. दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या लागोपाठच्या घडलेल्या घटनांनी शेततळ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कृषी विभागाकडून शेतकºयांमध्ये शेततळ्याच्या सुरक्षेबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.

शेततळे पोहण्यासाठी नाहीच. त्यामुळे त्यामध्ये पोहणे टाळायला हवे.शेततळ्यावरून जपून चाला. प्लॅस्टिकच्या कागदावरून पाय घसरण्याची शक्यता असते.प्लॅस्टिकमुळे पाण्यात पडल्यानंतरही बाहेर येणे अवघड होते. बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तरी प्लॅस्टिकवरून हात, पाय घसरतो.शेततळ्याच्या बाजूला खुंट्या ठोकून अथवा खांब रोवून पाण्यात दोरी टाकून ठेवावी. शेततळ्याच्या दोन बाजूला दोन मोठी लाकडे ठेवा.एकट्याने शेततळ्यातून बादलीच्या सहायाने पाणी काढू नये, तसेच शेततळ्याच्या भिंतीवर धुणे धुऊ नये़शेततळ्यावर लहान मुलांना सोबत घेऊन जाऊ नये़शेततळ्यात तरंगते ड्रम, भोपळे, ट्यूब सोडून ठेवाव्यात़शेततळ्याला कुंपण आवश्यक आहे. शेतकºयांना कुंपणाचा खर्च परवडत नसेल तर ते शेततळ्याच्या बाजूने बोराटीच्या काट्याही ठेऊ शकतात. त्यामुळे शेततळ्यावर कोणी जाऊ शकत नाही. सुरुवातीला कृषी विभागाकडून संपूर्ण शेततळ्यासाठी निधी दिला जात असे. त्यावेळी कुंपण केले जायचे. त्यानंतर आता निधीमध्ये कपात झाली. त्यामुळे काही शेतकरी कुंपण उभारत नसल्याचे दिसते. -अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर