In a hotel in the city, Irani Islam remains hidden; Offense to a manager with a hotel owner | नगरमधील हॉटेलमध्ये इराणी इसम राहिला ओळख लपून;  हॉटेल मालकासह व्यवस्थापकवर गुन्हा

नगरमधील हॉटेलमध्ये इराणी इसम राहिला ओळख लपून;  हॉटेल मालकासह व्यवस्थापकवर गुन्हा

अहमदनगर : कोरोनाची साथ पसरण्याचे सावट असतना शहरातील तारकपूर परिसरातील हॉटेल सिंग रेसिडेन्सीमध्ये मंगळवारी (दि.२४) तब्बल सहा तास एक इराणी इसम ओळख लपून राहून गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाला काही माहिती न देताच हा इराणी इसम हॉटेलमधून निघून गेल्याने खळबळ उडाली आहे. 
या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तत्काळ त्या इराणी  व्यक्तीचा शोध घेणे सुरू केले आहे. मंगळवारी पहाटे ३ वाजता हॉटेल सिंग रेसिडेन्सीमध्ये ईराज हुसेन रेझई (वय ४८) याने एक रुम बूक केली. यावेळी  त्याने केवळ स्वत:चे नाव सांगून इराण देशातील तेहरान येथील असल्याचे सांगितले. यावेळी हॉटेल व्यवस्थापकानेही त्याच्याकडून त्याचे ओळखपत्र घेतले नाही. तो ज्या कारमधून आला होता, त्या कारच्या  क्रमांकाची ही नोंद केली नाही. मंगळवारी सकाळी ९ वाजता ही इराणी व्यक्ती हॉटेलमधून निघून गेली. याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती मिळताच पोलीस हॉटेलमध्ये दाखल झाले. मात्र तोपर्यंत तो निघून गेलेला होता. सदर व्यक्तीने रूम बूक करताना हॉटेल व्यवस्थापकाला दिलेला मोबाइल क्रमांकही ही बनावट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सदर इराणी व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर परदेशी नागरिकाबाबत पोलिसांना माहिती कळविणे बंधनकारक असतानाही हॉटेल मालकाने व व्यवस्थापकाने सदर माहिती दिली नाही तसेच स्वत:ची ओळख लपून राहिल्याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल सिंग रेसिडेन्सीचे मालक कवलजीत सिंग गंभीर,  व्यवस्थापक रुपेश सोहनलाल गुलाटी व इराणी इसम ईराज हुसेन रेझई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा इराणी नगरमध्ये कशासाठी आला होता? कोणत्या उद्देशाने हॉटेलमध्ये राहिला.? आणि तो आता कोठे गेला आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इराण या देशातही मोठ्या प्रमाणात कोरोनाची साथ पसरली आहे. या पार्श्वभूमीवर  नगरमध्ये वावरणारा तो इराणी  धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पोलिसांनी त्याचा चौफेर शोध सुरू केला आहे.

Web Title: In a hotel in the city, Irani Islam remains hidden; Offense to a manager with a hotel owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.