वीज देयकासाठी सहकार्य करणाऱ्या सरपंच महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:24 AM2021-03-09T04:24:18+5:302021-03-09T04:24:18+5:30

ऊर्जाक्षेत्रात आपल्या कार्य व कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व अहोरात्र काम करणाऱ्या व कोरोना संकटातही अखंड ग्राहक सेवेला वाहून घेतलेल्या ...

Honoring Sarpanch women who cooperated for electricity payment | वीज देयकासाठी सहकार्य करणाऱ्या सरपंच महिलांचा सन्मान

वीज देयकासाठी सहकार्य करणाऱ्या सरपंच महिलांचा सन्मान

Next

ऊर्जाक्षेत्रात आपल्या कार्य व कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व अहोरात्र काम करणाऱ्या व कोरोना संकटातही अखंड ग्राहक सेवेला वाहून घेतलेल्या महिला जनमित्र यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी स्थापत्य विभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता कविता खोब्रागडे, प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री पोपटराव पवार, ॲड. मंजुषा सांगळे, स्वाती नगरकर, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापक रेणुका भिसे, उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन सहायक लेखापाल मनीषा पाठक यांनी केले. महाकृषी ऊर्जा अभियानाला प्रतिसाद देत हिवरेबाजारच्या कृषिपंपाचे २१५ ग्राहक ११ लाख रुपये थकबाकी भरून थकबाकी मुक्त झाले आहेत, याबद्दल त्यांचाही प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.

----------

Web Title: Honoring Sarpanch women who cooperated for electricity payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.