शिर्डीसह तालुक्यातील आठवडे बाजारावर प्रशासनाची टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:35 PM2021-03-13T17:35:00+5:302021-03-13T17:35:20+5:30

राहाता, शिर्डीसह तालुक्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश आज जारी केले.

The heel of the administration on the weekly market in the taluka including Shirdi | शिर्डीसह तालुक्यातील आठवडे बाजारावर प्रशासनाची टाच

शिर्डीसह तालुक्यातील आठवडे बाजारावर प्रशासनाची टाच

Next

शिर्डी : राहाता तालुक्यात कोरोनाचा संसर्ग लक्षात घेवून राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी राहाता, शिर्डीसह तालुक्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश आज जारी केले.

गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी राहाता व शिर्डी नगरपालिका कार्यक्षेत्र, संपुर्ण ग्रामीण भागात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये भरणारे जनावरांचे बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा बाजूस बसणारे तात्पुरते फेरीवाले, भाजीपाला व फळ विक्रेत्याबाबत स्थानिक प्राधिकरणाने योग्य ती दक्षता घेवून त्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत. हा बंदी आदेश येत्या ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू राहणार आहे.

तालुक्यातील अधिकृत रूग्णसंख्या अडीचशेपर्यंत पोहचली आहे. शिर्डीत शुक्रवारी सायंकाळपर्यंत ८१ नागरीक कोरोनाग्रस्त झाले होते तर राहात्याने पन्नाशी व लोणीनेही पस्तीशी ओलांडली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात रूग्ण तपासणी न करून घेता घरीच उपचार घेत आहे. तपासणी होवून समोर येणा-या रूग्णांपेक्षा हे प्रमाण कितीतरी अधिक असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

 

मास्क वापरासाठी पोलीस व स्थानिक प्रशासन दंडात्मक कारवाया करत असतांनाही काही नागरीक बेफिकीरीने वागतांना दिसत आहेत. तालुक्यात कोरोनाने आजवर साठ नागरीकांचे प्राण हिरावले आहेत.

 

Web Title: The heel of the administration on the weekly market in the taluka including Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.