Heart disease is the leading cause of death in young and old | तरुण आणि वृद्धांमध्ये हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण

तरुण आणि वृद्धांमध्ये हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण

जागतिक हृदय आरोग्य दिन विशेष

हृदयविकार म्हणजे काय?

हृदयाला प्राणवायुमुक्त रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांना धमणी म्हणतात. (करोनरी आरटरी) मनुष्याचे वय जसे वाढते व ज्यांना कार्डियॅक रिस्क फॅक्टर आहेत. त्यांच्या हृदयाच्या धमणीमध्ये चरबीचा थर जमा होतो. (अ‍ॅथरोक्सिरॉसीस) त्यामुळे धमणी चिंचोळी होते व हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो. ह्या चरबीच्या थराला जखम झाल्यास रक्ताची गुठळी तयार होते. हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. हृदयाचे स्नायू मृत पावतात व हृदयाचे कार्य मंदावते यालाच हृदयविकाराचा झटका म्हणतात.

रिस्क फॅक्टर काय आहे?
 उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल, अनुवंशिकता, टाइप ए पर्सनॅलिटी, तणाव, चिंता, नैराश्य, व्यायामाचा अभाव.

हृदयविकाराची लक्षणे कोणती आहेत?
हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूला छातीत आणि पाठीत कळ येऊन ती डावा खांदा, हात व मानेकडे जाते. पूर्ण शरीराला दरदरून घाम फुटतो. मळमळ व उलटी होते. काही जणांना गळा आवळल्यासारखे वाटते. श्वास घेण्यास त्रास होतो. काही जण चक्कर येऊन बेशुद्ध होतात. उपचार - ५० टक्के मृत्यू हे रुग्णालयात पोहचण्यापूर्वी होतात. ई.सी.जी. व टु डी इको केल्यानंतर पुढच्या उपचाराचा निर्णय घेतला जातो. अ‍ॅस्पिरिनची गोळी दिली जाते. 

आधुनिक उपचार पध्दती कोणती?
 प्रायमरी अ‍ॅन्जिओप्लास्टी : रुग्णाला कॅथलॅब सूट मध्ये घेऊन हाताच्या किंवा पायाच्या शिरेतून कॅथेटरच्या सहाय्याने हृदयाच्या धमणीमध्ये डाय (कॉन्ट्रास्ट) सोडले जाते व फोटो काढतात. (करोनरी अ‍ॅन्जिओग्राफी) धमणीतील रक्ताच्या गुठळ्या काढून तिथे स्टेंट बसवतात. (करोनरी अ‍ॅन्जिओप्लास्टी) व हृदयाचा खंडित झालेला रक्तपुरवठा सुरळीत चालू होतो. जे रूग्ण दूर आहेत. व ज्यांना ९० मिनिटांमध्ये कॅथ लॅबपर्यंत पोहचणे अशक्य आहे त्यांना रक्ताची गुठळी वितळण्याचे इंजेक्शन दिले जाते (थ्रंबोलिमीस)

हृदयविकार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
जीवनशैलीत बदल : समतोल आहार घ्यावा. आहारात चरबी व मीठाचे प्रमाण कमी आणि फायबर व जटील कार्बोदके यांचे प्रमाण जास्त असावे. हिरव्या पालेभाज्या व ताजी फळे खावीत. दररोज ३०-४० मिनिटे घाम येईपर्यंत शारीरिक व्यायाम करावा. (चालणे, पोहणे, सायकल चालवणे). मानसिक स्वास्थ्य स्थिर असावे. (योगा, मेडिटेशन) पोटाचा घेर कमी करावा. धूम्रपान करू नये व करत असल्यास बंद करावे. उच्च रक्तदाब, मधुमेह व उच्च कोलेस्टेटॉल असणाºयांनी नियमित तपासणी करून औषधे घ्यावीत.

-डॉ. सुदाम जरे, हृदयविकार तज्ज्ञ, डायरेक्टर कॅथ लॅब मॅककेअर हॉस्पिटल, सावेडी, अहमदनगर.

Web Title: Heart disease is the leading cause of death in young and old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.