शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

निपाणीवडगावच्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

By admin | Published: June 29, 2014 11:18 PM

अहमदनगर: दिंडीतच वारकऱ्याला मरण आले आणि ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा’, या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची अनुभूती देऊन एका वारकऱ्याने दिंडीतच

अहमदनगर: दिंडीतच वारकऱ्याला मरण आले आणि ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा’, या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची अनुभूती देऊन एका वारकऱ्याने दिंडीतच अखेरचा विश्राम घेतला. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील त्रिंबक तुकाराम थोरात (वय ५५) या वारकऱ्याचा रविवारी दुपारी दिंडीतील विश्रांतीच्या वेळी हृदयविकाराने मृत्यू झाला.आधीच एकदा हृदयविकाराचा झटका आलेला असतानाही विठ्ठल भेटीची आस मनात ठेवून वारीला निघालेल्या या वारकऱ्यावर काळाने झडप घातली. वारकरी विठ्ठल चरणी लीन झाल्याची भावना ठेवून वारकऱ्यांनीही हरिनामाच्या गजरात भक्ताला जड अंतकरणाने अखेरचा निरोप दिला. श्रीरामपूर तालुक्याकील निपाणी वडगाव येथील दिंडी पंढरपूरला जाते. वीरभद्र पायी दिंडी सोहळा असे या दिंडीचे नाव आहे. सुदाम महाराज चौधरी हे दिंडीचे चालक आहेत. दिंडीचे यंदा सहावे वर्ष आहे. दिंडीमध्ये दोनशे वारकरी सहभागी झाले होते. त्रिंबक थोरात यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ते ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होते. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांचा एक मुलगा टेलरिंग काम करून त्यांना हातभार लावायचा. थोरात यांना याआधी एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. मुलाने दिंडीत जाऊ नका, असेही सांगितले होते. मात्र विठ्ठलाच्या भेटीची आस मनात ठेवून दिंडीत जाणारच असा त्यांनी मनाशी निर्धार केला होता. पण काळाला वेगळेच अपेक्षित होते. दिंडी नगर तालुक्यातील वाळूंज येथे आली. दुपारी भोजन झाल्यानंतर वारकरी विश्रांती घेत होते. यावेळी थोरात यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा तातडीने घटनास्थळी दाखल झाला आणि त्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वडिलांची तब्येत ठीक आहे की नाही, हे पाहण्यासाठी थोरात यांच्या मुलाने दिंडीमध्ये एक-दोन वेळा भेट देऊन विचारपूस केली होती. विठ्ठलाच्या भेटीची आस असलेल्या थोरात यांची विठ्ठल भेटीची आस मात्र अधुरीच राहिली. जीवनाची वारी अर्ध्यावरच सोडून त्यांनी अखेरचा ‘राम राम’ घेतला.(तालुका प्रतिनिधी)