शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आजी-माजी आमदार पुत्रांना शहरबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:51 AM

मोहरम व गणेशोत्सवादरम्यान शहरात शांतता रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने विक्रम राठोड, सचिन जगताप, श्रीपाद छिंदम यांच्यासह ३०० जणांना ११ ते २३ सप्टेंबरपर्यंत नगर शहर हद्दीत प्रवेश बंदी केली आहे़ जिल्ह्यातील एकूण ५०० जणांवर कलम १४४ (२) प्रमाणे प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे नगर शहरातील ३०० तर जिल्हाभरातील ५०० जण तडीपार

अहमदनगर : मोहरम व गणेशोत्सवादरम्यान शहरात शांतता रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने विक्रम राठोड, सचिन जगताप, श्रीपाद छिंदम यांच्यासह ३०० जणांना ११ ते २३ सप्टेंबरपर्यंत नगर शहर हद्दीत प्रवेश बंदी केली आहे़ जिल्ह्यातील एकूण ५०० जणांवर कलम १४४ (२) प्रमाणे प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे.पोलीस प्रशासनाने उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावानुसार ही कारवाई करण्यात आली आहे़ शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर केडगाव येथे दंगल करणारे, पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून तोडफोड करणारे यासह सराईत गुन्हेगार, विविध गुन्ह्यात सहभाग असलेल्यांवर उत्सव काळात शहरबंदीची कारवाई करण्यात आली आहे़ नगर शहर हद्दीतून आमदार पुत्र सचिन जगताप, माजी आमदार पुत्र विक्रम राठोड, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यासह बिरजू राजू जाधव, गजेंद्र सैंदर, महेश उर्फ बिट्ट्या निकम, दिनेश सैंदर, रशिद अब्दुल शेख उर्फ दंडा, घनश्याम बोडखे, विकास खरपुडे, अदिनाथ उर्फ लक्ष्मण जाधव, अभिषेक भोसले, दुर्गाजी शिंदे, अनिल सैंदर, प्रकाश सैंदर, शेख कलिम रफिक, शेख तनवीर, मोहसीन शेख, अंकुश चत्तर, करण उर्फ बंटी ढापसे, भावेश उर्फ बंटी राऊत, सागर डोंगरे, बंटी उर्फ विष्णूपंत खैरे, सचिन शिंदे, अशोक दहिफळे, गणेश कोतकर, विजय पटारे, दत्तात्रय नागापुरे, जावेद शेख, नंदू बोराटे, विजय गवळी, अनिल पवार, सुरज जाधव, करण ससे, टकलू मुक्तार शेख, अजहर मंजूर शेख, संतोष सूर्यवंशी, परशूराम उर्फ परेश खराडे, शिवाजी अनभुले, भाऊसाहेब कराळे आदींचा कारवाई केलेल्यांत समावेश आहे. उत्सव काळात नगर शहरात प्रवेश बंदी करण्यात आलेल्यांमध्ये विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे़ केडगाव दंगल आणि अधीक्षक कार्यालयात तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांचाही यामध्ये समावेश आहे़ या कारवाईतून पक्षाचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व विद्यमान नगरसेवकांना वगळण्यात आले आहे.साडेतीन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईउत्सव काळातील दक्षता म्हणून पोलिसांनी विविध कलमातंर्गत जिल्ह्यातील साडेतीन हजार पेक्षा जास्त जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे़ यामध्ये बहुतांशी जणांना नोटीस देणे, गुन्हेगारी कृत्य करणार नाही याचे हमीपत्र लिहून घेणे अशा स्वरूपाच्या कारवाईचा समावेश आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस