शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

निंबोडी शाळेच्या बांधकामावर अखेर सरकारी मोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 2:03 PM

बहुचर्चित निंबोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामास जिल्हा परिषदेने गुरुवारी कार्यारंभ आदेश दिला आहे.

अहमदनगर : बहुचर्चित निंबोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामास जिल्हा परिषदेने गुरुवारी कार्यारंभ आदेश दिला आहे. जुन्या शाळेपासून जवळच असलेल्या जागेत १४ खोल्यांची नवीन इमारत पुढील सहा महिन्यांत बांधून पूर्ण करण्याचा बांधकाम विभागाचा प्रयत्न आहे.निंबोडी येथे सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चून नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. ठेकेदार नलगे यांना काम सुरू करण्याचे आदेश बांधकाम विभागाने दिले आहेत. जुन्या शाळेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जागेत १४ शाळा खोल्यांसह संरक्षण भिंत आणि मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्यात येतील. बांधकाम विभागाकडून लवकरच गावातील जागा ताब्यात घेऊन स्वच्छता केली जाणार आहे.निंबोडी येथील दुर्घटनेत तीन मुलांचा मृत्यू झाला. तसेच भिंत अंगावर कोसळून पाचवीच्या वर्गातील १४ मुले जखमी झाली. या दुर्घटनेला वर्ष उलटून गेले़ नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. मुले शाळेत दाखल होऊ लागली. पण, नवीन शाळेची एक वीटही प्रशासनाने चढविली नाही. त्यामुळे शाळा सुरू होतानाच पर्यायी जागेत भरविण्यात आली. ‘लोकमत’ ने निंबोडीची शाळा विठ्ठलाच्या दारी, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील लालफितीचा कारभार चव्हाट्यावर आला़ त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हलली़ जिल्हा परिषदेने तातडीने संबंधित ठेकेदाराला बांधकाम सुरू करण्याचा आदेश दिला. त्यामुळे निंबोडी शाळेचा प्रश्न मार्गी लागला आहे. शाळेचे बांधकाम रखडल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे व अध्यक्षा शालिनी विखे यांच्यात राजकीय वाद उफाळून आला. दोन्ही बाजूंनी आरोप झाले. अखेर निंबोडीच्या शाळेच्या बांधकामाला प्रशासनाने हिरवा कंदील दाखविल्याने हा वाद निवळला आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद