शासनाने दूध खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:19 AM2021-04-10T04:19:54+5:302021-04-10T04:19:54+5:30

कोपरगाव : कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून दुग्ध व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. राज्य ...

The government should provide relief to the farmers by purchasing milk | शासनाने दूध खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

शासनाने दूध खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

Next

कोपरगाव : कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून दुग्ध व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. राज्य शासनाने बंद केलेली दूध खरेदी पुन्हा, सुरु करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नामदेवराव परजणे पाटील दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

परजणे म्हणाले, राज्यात साधारणतः दीड कोटी लिटरच्या जवळपास गाईच्या दुधाचे दररोज संकलन केले जात होते. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे दुधाची मागणी घटली. दूध उत्पादन खर्च आणि महागाईमुळे मोठी तफावत निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना हा व्यवसाय परवडेनासा झाला. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना संसर्गाची अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. लॉकडाऊन सुरु झाल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांची ग्राहकांकडून खरेदी कमी झाली आहे. दुधाची मागणी देखील २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तोटा सहन केला. दोन- तीन महिन्यात परिस्थिती थोडीफार सुधारलेली असतानाच पुन्हा कोरोना महामारीने डोके वर काढल्याने दुग्ध व्यवसायावर आता पुन्हा मोठा परिणाम जाणवू लागला आहे. शेतीपूरक व्यवसायांपैकी एक महत्त्वपूर्ण व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जात असल्याने या व्यवसायाला बळ देण्याचे काम शासनाकडून होणे गरजेचे आहे.

Web Title: The government should provide relief to the farmers by purchasing milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.