शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

सरकारी नोकरीचे आमिष : चार जणांना साडे सहा लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 7:35 PM

सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून चार जणांना सहा लाख ५२ हजारांचा गंडा घालून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात बुधवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर : सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून चार जणांना सहा लाख ५२ हजारांचा गंडा घालून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात बुधवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.योगेश नामदेव वर्पे (रा. देवगाव, ता. संगमनेर) असे फसवणुक करणाºया व्यक्तीचे नाव आहे. सन २०१२ ते २०१९ या सात वर्षाच्या काळात वर्पे याने फसवणुक केल्याची फिर्याद निलेश अरूण गणोरे (वय ३८, रा. इंदिरनगर, गल्ली क्रमांक २) यांनी दिली असून पोलीसांनी वर्पे याला अटक केली आहे.निलेश गणोरे यांचे दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले असून २०१२ ला संगमनेरातील एका कापड दुकानात ते कामाला होते. दरम्यान, त्यांची योगेश वर्पे याच्यासोबत ओळख झाली. माझ्या अनेक ठिकाणी ओळखी आहेत. तुला चांगले ठिकाणी शिपाई म्हणून काम लावून देतो. तुझी पैसे खर्च करण्याची तयारी असल्यास सरकारी नोकरी लावून देतो’असे आमिष वर्पे याने दाखविले. २०१३ ला शिक्षण विभागात नोकरी लावून देणार असल्याचे सांगत वर्पे याने निलेश गणोरे यांसह त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या कोºया स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या. फोटो व त्यांच्याकडून सत्तर हजार रुपये घेतले. त्यानंतर २०१४ ला वर्पे याने शिक्षण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोकरी लागल्याचे नियुक्ती पत्र गणोरे यांना दाखवित त्यांच्याकडून पुन्हा ८० हजार रुपये घेतले. भरती निघाल्यानंतर तुझे काम होईल, असे सांगितले. त्यानंतर गणोरे यांनी त्याच्याकडे नियुक्ती पत्राची मागणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यात सुरवात केली. अनेक दिवस उलटूनही नोकरी लागत नसल्याने गणोरे यांनी वर्पेकडे नोकरी लावण्यासाठी दिलेल्या १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर गणोरे यांना त्याने धमकावण्यास सुरवात केली. २०१५ नंतर वर्पे याने अशाच प्रकारची फसवणूक करून किरण शंकर आव्हाड यांच्याकडून २ लाख ५० हजार, मंगल अनिल उनवणे यांच्याकडून १ लाख २७ हजार व रविंद्र रामचंद्र कासार यांच्याकडून १ लाख २५ हजार असे एकूण पाच लाख दोन हजार रुपये तसेच निलेश गणोरे यांनी दिलेले १ लाख ५० हजार अशी सर्व रक्कम मिळून या चार जणांना सहा लाख ५२ हजारांचा गंडा घातला. त्यानंतर बुधवारी (२३ जानेवारी) योगेश वर्पे विरोधात निलेश गणोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम तपास करीत आहेत.सरकारी नोकरी मिळविण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नसते. अशा प्रकारे कुणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. - पंकज निकम, पोलीस उपनिरीक्षक, संगमनेर शहर पोलीस ठाणे

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर