शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कर्जत-जामखेडला हक्काचे पाणी द्या : रोहित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:29 AM

कर्जत-जामखेड तालुक्यातील कुकडी डावा कालवा व चिंचणी धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समन्यायी पद्धतीने पाणीवाटप व्हावे.

जामखेड : कर्जत-जामखेड तालुक्यातील कुकडी डावा कालवा व चिंचणी धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समन्यायी पद्धतीने पाणीवाटप व्हावे. दोन्ही तालुक्यांना हक्काचे पाणी द्या, अशी मागणी राष्टÑवादीचे नेते रोहित पवार यांनी कुकडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.पुण्यातील सिंचन भवन येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी शिष्टमंडळासमवेत कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, मुख्य अभियंता व्ही. जी. रजपूत, मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते व कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. टी. धुमाळ यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीत पवार यांनी वरील मागणी केली.पवार म्हणाले, कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या अंतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील ५२ गावे डावा कालवा व चिंचणी धरण कालव्याच्या लाभक्षेत्रात आहेत. याचबरोबर भोसे खिंड बोगद्यातून पावसाळ्यात १.२ टीएमसी अतिरिक्त पाणी सीना धरणात सोडले जाते. गेल्या काही वर्षांपासून कर्जत-जामखेड तालुक्याचा बहुतेक भाग दुष्काळात होरपळत आहे. त्यातच कुकडी डावा कालवा व चिंचणी धरण कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांसह शेवटच्या भागातील गावांना सिंचनाचे पाणी वितरिकांमधून योग्य त्या दाबाने व पुरेसे मिळत नाही. पाणी योग्य त्या दाबाने व हक्काचे पुरेसे पाणी समन्यायी पद्धतीने शेतीपर्यंत पोचविण्यासाठी व वितरिकांची दुरुस्ती करण्यासाठी पाटबंधारे खात्याने तत्परतेने पावले उचलावीत असे ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतJamkhedजामखेड